नितीन अग्रवाल नवी दिल्ली : अवकाळी पाऊस आणि पुराचा फटका बसून झालेले नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला ९५७ कोटी रूपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने महाराष्ट्रासह अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या सात राज्यांसाठी राष्ट्रीय नैसर्गिक संकट निधीतून (एनडीआरएफ) पाच हजार ९०८.५६ कोटी रूपयांचे आर्थिक साह्य मंजूर केले.अधिकृत सूत्रांनुसार त्यात ६१६.६३ कोटी रूपये आसामला,२८४.९३ कोटी रूपये हिमाचल प्रदेशला, १,८६९.८५ कोटी रूपये कर्नाटकला दिले जातील. याशिवाय १,७४९.७३ कोटी रूपये मध्यप्रदेश, ६३.३२ कोटी रूपये त्रिपुरा आणि ३६७.१७ कोटी रूपये उत्तर प्रदेशला दिले जातील.या बैठकीला अर्थ मंत्री निर्मला सीतारामन, गृहमंत्रालय, कृषी मंत्रालय आणि नीती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्या आधी केंद्र सरकारने हंगामी साह्य म्हणून चार राज्यांना ३,२०० कोटी रूपये आधीच दिले आहेत. त्यातील एक हजार २०० कोटी रूपये कर्नाटक, मध्य प्रदेशला एक हजार कोटी आणि महाराष्ट्राला ६०० आणि ४०० कोटी रूपये बिहारला दिले गेले आहेत. याशिवाय २७ राज्यांना राज्य आपदा साह्य निधीअंतर्गत २७ राज्यांना चालू आर्थिक वर्षात ८,०६८ कोटी रूपये आधीच दिले गेले आहेत.या नीधीमुळे आता राज्यातील विविध विकासकामांना चालना मिळणार असून अपूर्ण कामे पूर्ण होतील.
महाराष्ट्रासह सात राज्यांना ५,९०८ रुपये मंजूर, राज्याला मिळणार ९५७ कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 4:56 AM