सर्वांना समान अधिकार आणि संधी हा लोकशाहीचा आधार आहे, असं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी व्यक्त केलं. पंतप्रधान मोदींनी अटलजींच्या सरकारसह काँग्रेस आणि मागील सरकारांवर सात वेळा टीका केली. सत्ताधारी पक्ष संसदेचे कामकाज चालू देत नाही. राजनाथ सिंह आणि पीयूष गोयल यांनी संसदेचे कामकाज होऊ दिले नाही. एवढेच नाही तर एनडीए सरकारने सुधा भारद्वाज यांना तीन वर्षे तुरुंगात ठेवलं, असं सिंह म्हणाले.
लोकमत संसदीय पुरस्कारांच्या चौथ्या आवृत्तीचा (वर्ष २०२२) पुरस्कार वितरण समारंभ माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १४ मार्चला दिल्लीत पार पडणार आहे. या पुरस्कार वितरण समारंभापूर्वी, तेलंगणा सरकारच्या सहकार्यानं 'लोकमत नॅशनल कॉनक्लेव्ह' होत आहे. 'भारतीय लोकशाही : परिपक्वतेच्या किती जवळ' (इंडियन डेमोक्रसी : हाऊ क्लोझ टू मॅच्युरिटी) या विषयावर विविध राजकीय पक्षातील ज्येष्ठ नेते आपले विचार मांडत आहेत. यावेळ दिग्विजय सिंह यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.
अनेक पत्रकारांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. एनडीए सरकारमध्ये लोकशाही धोक्यात आली असून आमदार विकत घेऊन काँग्रेसचे सरकार पाडण्यात आलं. भारतीय जनता पक्षाच्या लोकांची अवस्था सध्या बिकट झाली असल्याचेही ते यावेळी म्हणाले. जे लोक मोदींविरोधात बोलतात त्यांच्या मागे सक्तवसूली संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) लागले आहेत. ईडी, सीबीआय आणि आयकर विभागावर ताशेरे ओढले जात आहेत. नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करताच चांगले झाले, असं वक्तव्यही सिंह यांनी केलं.
सर्जिकल स्ट्राईकवरही स्पष्टीकरणदिग्विजय सिंह यांनी यापूर्वी सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर त्यांच्यावर अनेक स्तरातून टीका करण्यात आली होती. “माझा प्रश्न लष्कराला नव्हता. त्यांना जे टार्गेट दिलं त्यांना स्ट्राईक केला. परंतु सर्जिकल स्ट्राईकवर पहिलं वक्तव्य अमित शाह यांचं आलं की आम्ही ३०० दहशतवादी मारले. सुषमा स्वराज यांचं वक्तव्य आलं की जिथे पॉप्युलेशन नव्हतं तिथं स्ट्राईक केला. अजित नाथ म्हणाले ४५० मारले. माझं म्हणणं फक्त सरकारला होतं. राजकारणात विचारांना स्वातंत्र्याला महत्त्व असतं.” असं ते म्हणाले. राहुल गांधींनी यापासून हात झाडले पण मी माझ्या वक्तव्यावर आजही कायम असल्याचे ते राजनाथ सिंह म्हणाले.