अरे देवा! नियमावलीची एैशीतैशी, सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, झाली चेंगराचेंगरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 08:35 AM2021-07-27T08:35:43+5:302021-07-27T08:38:09+5:30

Several injured in stampede like situation at Mahakaleshwar Temple : मंदिरात दर्शन घेण्यासाठी काही व्हिआयपी मंडळी आली होती. याच दरम्यान लोकांनी देखील मोठी गर्दी केली. यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली.

several injured in stampede like situation at mahakaleshwar temple in ujjain | अरे देवा! नियमावलीची एैशीतैशी, सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, झाली चेंगराचेंगरी

अरे देवा! नियमावलीची एैशीतैशी, सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, झाली चेंगराचेंगरी

googlenewsNext

नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान कोरोचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी याचे पालन होत नसल्याचं पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. कोरोना नियमावलीची एैशीतैशी अन् सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अनेक राज्यांत मंदिर बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र याच दरम्यान मंदिरातील गर्दीचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. 

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) उज्जैनमधील (Ujjain) महाकालेश्वर मंदिरात (Mahakaleshwar Temple) सोमवारी मोठी गर्दी झाली होती. यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होऊन अनेक महिला आणि लहान मुलं यामध्ये जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मंदिरात उपस्थित असलेल्या काही लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरात दर्शन घेण्यासाठी काही व्हिआयपी मंडळी आली होती. याच दरम्यान लोकांनी देखील मोठी गर्दी केली. यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, उमा भारती यांच्यासह अनेक नेते मंडळी आली होती. 

मंदिरातील गर्दीचा आणि झालेल्या चेंगराचेंगरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मंदिराच्या गेट नंबर 4 मधून काही भाविक हे धक्का-बुक्की करत आत घुसण्याचा प्रयत्न करत होते. ज्यामुळे काही काळ गोंधळाचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परिस्थिती नियंत्रणात आणणाऱ्या पोलिसांसोबत देखील धक्काबुक्की करण्यात आल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कोरोनात देवी कोपली म्हणत गावकऱ्यांची मोठी गर्दी

काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशमध्ये अशीच एक घटना समोर आली होती. देवी नाराज झाली, देवीचा कोप झाला असं म्हणत गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केलं. सर्व नियम धाब्यावर बसवले. देवीला आनंदी करण्यासाठी आणि तिची माफी मागण्यासाठी एकत्र आल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं होतं. आंध्रप्रदेशच्या पूर्वेकडील गोदावरी जिल्ह्यात भक्तांनी देवीची प्रार्थना केली. देवीच्या कोपामुळे कोरोनाची दुसरी लाट आल्याचं या गावकऱ्यांचं म्हणणं असल्याने ते प्रार्थनेसाठी एकत्र जमले. पूर्व गोदावरी भागाचे पोलीस अधीक्षक नयीम असीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये काही लोकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र, ग्रामस्थांचा हा समज आहे की देवीचा कोप झाल्याने हे सर्व घडलं आहे. म्हणूनच देवीला खूश करण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येण्याचं ठरवलं.

Read in English

Web Title: several injured in stampede like situation at mahakaleshwar temple in ujjain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.