मुलासमोर लैंगिक संबंध, नग्न होणे लैंगिक छळच; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा - केरळ हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 07:22 AM2024-10-18T07:22:16+5:302024-10-18T07:22:57+5:30
न्यायमूर्ती ए. बद्रुद्दीन यांनी भारतीय दंड संहिता (आयपीसी), पोक्सो कायदा आणि बाल न्याय कायद्यांतर्गत विविध गुन्ह्यांसाठी दाखल केलेला खटला रद्द करण्याची मागणी करणाऱ्या एका व्यक्तीने केलेल्या याचिकेवर हा निकाल दिला.
कोची : एखाद्या अल्पवयीन मुलासमोर लैंगिक संबंध ठेवणे किंवा नग्न होणे हे एखाद्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्यासारखे आहे. हा लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असल्याचे केरळ हायकोर्टाने म्हटले आहे.
न्यायमूर्ती ए. बद्रुद्दीन यांनी भारतीय दंड संहिता (आयपीसी), पोक्सो कायदा आणि बाल न्याय कायद्यांतर्गत विविध गुन्ह्यांसाठी दाखल केलेला खटला रद्द करण्याची मागणी करणाऱ्या एका व्यक्तीने केलेल्या याचिकेवर हा निकाल दिला.
खोलीचा दरवाजा बंद न करता एका लॉजमध्ये एका अल्पवयीन मुलीच्या आईसोबत लैंगिक संबंध ठेवल्याचा आणि नंतर या कृत्याचा साक्षीदार असलेल्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप या व्यक्तीवर होता. आरोपीने त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे आपल्या याचिकेत म्हटले होते.
न्यायालयाने म्हटले...
nजेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या मुलाला त्याचे नग्न शरीर दाखवते, तेव्हा ते मुलावर अत्याचाराच्या उद्देशाने केलेले कृत्य असते.
nत्यामुळे पोक्सो कायद्याचे कलम ११(आय) (लैंगिक छळ) अंतर्गत शिक्षेचा गुन्हा, कलम १२ (लैंगिक छळासाठी शिक्षा) लागू होईल, असे न्यायालयाने सांगितले. या प्रकरणात, आरोपीने नग्न झाल्यानंतरही मुलाला खोलीमध्ये प्रवेश करू दिला,
आईने रोखले नाही
या प्रकरणात याचिकाकर्त्यावर पोक्सो कायद्याच्या कलम ११(आय) आणि १२ नुसार दंडनीय गुन्हा केल्याचा आरोप आहे.
आरोपीने मुलाला मारहाण केली आणि अल्पवयीनच्या आईने त्याला रोखले नाही. त्यामुळे कलम ३२३ (जाणूनबुजून दुखापतसाठी शिक्षा) आणि ३४ (समान हेतू) अंतर्गतदेखील गुन्हा केला आहे.