नवी दिल्ली : भारतात २०१८ मध्ये दरदिवश्ी सरासरी १०९ बालकांचे लैंगिक शोषण झाले असून, २०१७ च्या तुलनेत अशा घटना २२ टक्क्यांनी वाढल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) अहवालात म्हटले आहे. एनसीआरबीने अलीकडेच जारी केलेल्या आकडेवारीनुसार २०१७ मध्ये अशा ३२,६०८ घटना घडल्या होत्या; तर २०१८ मध्ये पोक्सोतहत अशा ३९,८२७ घटना नोंदवल्या गेल्या.
लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार आणि अश्लील साहित्य छायाचित्र अशा गुन्ह्यांपासून बालकांचे रक्षण करणारा कायदा (पोक्सो-२०१२) सर्वंकष आहे. बालकांच्या लैंगिक शोषणासंबंधीचे खटले निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालय, विशेष विधिज्ञ आणि पीडित बालकांना भावनात्मक आधार देत मदत करणाऱ्या व्यक्तींची गरज असते. चाईल्स राईटस् अॅण्ड यू (क्राय)च्या धोरण व समर्थक संचालक प्रीती महरा यांनी सांगितले की, बालकांवर अत्याचार करण्याचे गुन्हे वाढणे, ही बाब चिंताजनक आहे, तर दुसरीकडे अशा घटनांबाबत तक्रारी नोंदविण्याची वाढती प्रवृत्ती बघता लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास वाढल्याचे दिसते.
२०१८ मध्ये बालकांचे अपहरण करण्याचे गुन्ह्यांचे प्रमाण ४४.२ टक्के होते, तर पोस्कोतहत घडलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण ३४.७ टक्के होते.अश्लील साहित्य चित्रासाठी बालकांचा वापर करणे किंवा बालकांशी संबंधित अश्लील साहित्य-चित्रे संग्रहित करण्याच्या ७८१ घटना घडल्या. २०१७ च्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. एनसीआबीच्या आकडेवारीनुसार देशभरातील सर्व प्रकारच्या गुन्ह्यांपैकी बालकांशी संबंधित गुन्ह्यांच्या राज्यनिहाय प्रमाणानुसार उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली आणि बिहारमध्ये ५१ टक्के आहे.बालकांशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण सहापटीने वाढले1. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २०१८ मध्ये बालकांवर बलात्कार करण्याच्या २१,६०५ घटना घडल्या. यापैकी २१,४०१ बालिका होत्या, तर २०४ बालक होते. बालकांवर बलात्कार करणाºयाच्या सर्वाधिक २,८३२ घटना महाराष्टÑात घडल्या. त्यानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. २०१८ मध्ये उत्तर प्रदेशात २०२३, तामिळनाडूत १,४५७ घटना घडल्या.2. २००८ ते २०१८ या दहा वर्षांत बालकांशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण सहापटीने वाढले आहे. २००८ मध्ये २२,५००, तर २०१८ मध्ये १,४१,७६४, असे गुन्हे घडले. २०१७ मध्ये १,२९,०३२ अशा घटना घडल्या होत्या.