नवी दिल्ली : मुझफ्फरपूर आश्रमशाळेतील लैंगिक अत्याचाराचा खटला बिहारमधून दिल्लीतील न्यायालयात हलविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आजवर झाले ते पुरे झाले. यापुढे आश्रमशाळांतील मुला-मुलींवर होणारे अत्याचार रोखायलाच हवेत, असेही कोर्टाने बिहारमधील नितीशकुमार सरकारला बजावले आहे.बिहारमधील १६ आश्रमशाळांच्या ढिसाळ व्यवस्थापनाबाबत मागविलेली माहिती व अन्य गोष्टींना नीट प्रतिसाद न दिल्यास राज्याच्या मुख्य सचिवांवर समन्स बजावले जाईल, असा इशारा देऊन न्यायालयाने म्हटले आहे की, मुझफ्फरपूर आश्रमशाळेच्या खटल्याचे कामकाज सहा महिन्यांत पूर्ण करा. बिहारमधील आश्रमशाळांच्या स्थितीबाबत टाटा समाजविज्ञान संस्थेच्या अभ्यासातून मुझफ्फरपूर आश्रमशाळेतील लैंगिक शोषणाच्या कहाण्या उजेडात आल्या होत्या.
लैंगिक अत्याचार खटला आता चालणार दिल्लीत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 4:45 AM