- संतोष ठाकूर नवी दिल्ली : मध्य प्रदेशमधील शहडोल याठिकाणी कार्यरत असलेले आॅल इंडिया रेडिओचे सहायक संचालक रत्नाकर भारती यांना नऊ सहकारी कर्मचारी महिलांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी सरकारकडून सक्तीने सेवानिवृत्त केले जाण्याची शक्यता आहे. महिलांनी केलेल्या तक्रारीनंतर आॅल इंडिया रेडिओने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने भारती दोषी असल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर कठोर कारवाईची शिफारस केली होती. भारती यांना मिळणारे पेन्शन तसेच अन्य भत्ते कारवाई अंतर्गत नाकारले जाऊ शकतात. सध्या भारती यांची चौकशी सुरू आहे.रत्नाकर भारती कार्यालयातील नियमांचे सातत्याने उल्लंघन करीत आले आहेत. याबाबत लोकमतने भारती यांना संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केला. परंतु तो होऊ शकला नाही. आॅल इंडिया रेडिओच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रत्नाकर भारती यांच्याविरोधात याआधीही तक्रारी आल्या होत्या. परंतु मुदत करारावर ठेवण्यात आलेल्या कर्मचाºयांना नोकरीत नियमित न केल्याने त्यांच्याविरोधात हेतूपुरस्सर या तक्रारी केल्या जात असाव्यात, असे त्यावेळी मानले गेले.परंतु शहडोलमध्ये नऊ महिलांनी केलेल्या तक्रारींचे प्रकरण समोर येताच याबाबत अंतर्गत चौकशी समितीला तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली. समितीने तातडीने चौकशी पूर्ण करून तक्रारींमध्ये प्राथमिकदृष्ट्या तथ्य आढळल्याने भारती यांचीअन्यत्र बदली करण्याची शिफारस केली होती.तक्रारदारांना काढून टाकल्याचे आरोप निराधारहे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दिल्ली, कुरुक्षेत्र, ओबरा, सागर, रामपूर आणि धरमशाला येथूनही याच प्रकारच्या अनेक तक्रारी पुढे आल्याची चर्चा आहे. तसेच शहडोलमध्ये तक्रार केलेल्या महिलांना नोकरीवरून काढून टाकल्याची चर्चाही सुरू आहे. परंतु आॅल इंडिया रेडिओच्या एका अधिकाºयाने सांगितले की, खरेतर ज्या महिलांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्यांचे मुदत करार संपले होते. तक्रार केल्यानंतर त्यांना नोकरीवरून काढून टाकल्याचे आरोप निराधार आहेत.
आॅल इंडिया रेडिओत महिलांचा लैंगिक छळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 1:32 AM