कोट्टायम : केरळमधील कोट्टायम शहरातील एका चर्चमधील 5 पादरींना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर एक महिलेचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेच्या पतीने यासंबंधी तक्रार केली आहे.
चर्चमध्ये आलेल्या या महिलेसोबत पादरींनी लैगिंक छळ केला आणि तिला ब्लॅकमेक करण्याचा प्रयत्न केला आहे. येथील मलंकारा ऑर्थोडॉक्स सिरीयन चर्चमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी पादरींना चर्चमधून निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, चर्चचे जनसंपर्क अधिकारी पी. सी. इलियास यांनी सांगितले की, या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरु आहे, यासंबधी अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल. तसेच, सोशल मीडियावर अनेक तक्रारी येत आहेत. मात्र, चर्चच्या चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत वाट पाहावी लागेल.
पीडित महिलेच्या पतीने सांगितले की, याप्रकरणी 7 मे रोजी नीरानाम धर्म प्रांताच्या अध्यक्षांकडे तक्रार केली होती. मात्र यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तसेच, तीन आरोपी नीरानाम धर्म प्रांताचे आहेत. तर बाकीचे दिल्ली आणि थुमपामोन धर्म प्रांताचे आहेत. या आरोपींच्या विरोधात पुरावा असल्याचेही पीडित महिलेच्या पतीने म्हटले आहे.
दरम्यान, केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये पीडित महिलेचा पती संबंधित घटनेची माहिती सांगत असून आरोप असलेल्या एक पादरीने लग्नाच्या आगोदर पत्नीसोबत लैगिंक छळ केल्याचे त्यांने या क्लिपमध्ये म्हटले आहे.