शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

मोठा निर्णय! लग्नाच्या खोट्या आश्वासनानंतरचे शारीरिक संबंध बलात्कार ठरत नाही- न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 3:02 AM

न्यायमूर्ती पाणिग्रही यांनी गुरुवारी बलात्कार खटल्यातील आरोपीला जामीन मंजूर करताना नोंदवले व कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द केला.

कटक (ओदिशा) : लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवल्यास त्याला बलात्कार म्हणता येणार नाही, असे महत्त्वाचे निरीक्षण ओदिशा उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायमूर्ती एस.के. पाणिग्रही यांनी असेही प्रश्न उपस्थित केले आहेत की, ज्या शारीरिक संबंधांमध्ये महिला स्वेच्छेने सहभागी झाली आहे, त्यांच्या नियमनासाठी बलात्कार कायद्याचा वापर केला जावा का? न्यायमूर्ती पाणिग्रही यांनी गुरुवारी बलात्कार खटल्यातील आरोपीला जामीन मंजूर करताना नोंदवले व कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द केला.नोव्हेंबर २०१९ आदिवासी महिलेने (१९) दिलेल्या तक्रारीवरून ओदिशातील कोरापूत जिल्ह्यातील विद्यार्थ्याला अटक झाली होती. तक्रारीतील तपशिलानुसार ती महिला आणि आरोपी विद्यार्थी हे एकाच खेड्यातील असून, चार वर्षांपूर्वी त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले व त्यातून ती दोन वेळा गरोदर राहिली.‘माझ्या निष्पापपणाचा गैरफायदा घेऊन आणि मी तुझ्याशी लग्न करीन, असे खोटे आश्वासन देऊन माझ्याशी शारीरिक संबंध स्थापन केले’, अशा आरोपांची तक्रार त्या महिलेने पोलिसांकडे केली होती. आरोपीने मला गर्भपाताच्या गोळ्या जबरदस्तीने खायला देऊन गर्भपात करायला लावले, असाही दावा तिने तक्रारीत केला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून विद्यार्थ्याला अटक केली. गेल्या सहा महिन्यांपासून तो तुरुंगात होता.उच्च न्यायालयाने गुरुवारी त्याला सशर्त जामीन मंजूर केला. त्याने सरकार पक्षाला सहकार्य करायचे आणि पीडित महिलेला धमक्या द्यायच्या नाहीत, अशा त्या अटी आहेत.>काय म्हणाले न्यायाधीश?12 पानी आदेशात न्या. पाणिग्रही यांनी बलात्कार कायद्याची तपशिलात चर्चा केली आणि निरीक्षण नोंदवले की, कोणत्याही आश्वासनाशिवाय पण उभयतांनी सहमतीने शारीरिक संबंध ठेवले असतील, तर तो भारतीय दंड संहितेचे कलम ३७६ नुसार बलात्कार ठरत नाही. या विषयावर सखोल विचार करण्याची गरज असल्याचे सांगून न्या. पाणिग्रही म्हणाले की, असे खटले हे कायदे आणि न्यायालयीन घोषणांद्वारे कसे हाताळायचे, असे प्रश्न वारंवार उपस्थित होतात.न्या. पाणिग्रही यांनी असेही म्हटले की, गरीब आणि सामाजिकदृष्ट्या दुबळ्या पीडितांना लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंधांना भाग पाडले जाते; परंतु त्यांचे दु:ख बलात्काराचे कायदे हलके करण्यात नेहमीच अपयशी ठरतात.

टॅग्स :Rapeबलात्कार