नवी दिल्ली - 'जर तुमच्या घरी कोणी येत असेल तर ते रिकाम्या हाताने येत नाही. नक्कीच काहीतरी घेऊन येतात. शाहीन बागेत सुरू असलेल्या निषेध आंदोलनात असचं काहीसं सुरू आहे. इथे कोणी येत असेल तर तो आंदोलकांसाठी काहीतरी खाण्याचं घेऊन येतो. जसं मी कॉलेजमध्ये शिकतो आणि मी येथे रोज येतो, कधीकधी डझनभर केळी आणतो, कधीकधी दुसरंकाही. जेणेकरून जे लोक संविधान वाचविण्यासाठी लढत आहेत त्यांना मी पाठिंबा देऊ शकतो असं शाहिद बागच्या स्टेजजवळ केळी वाटप करणारा विद्यार्थी मोहम्मद अफरोज यांचं म्हणणं आहे.
मोहम्मद अफरोजने सांगितले की आम्ही इतके दिवस याठिकाणी कसे बसलो आहोत हा सर्वांचाच प्रश्न आहे. अन्न कसे येत आहे, परंतु मला एक गोष्ट सांगायची आहे की जर तुमचा हेतू चांगला असला तर कोणतीही समस्या आली तरी त्या प्रत्येक अडचणीवर मात केली जाऊ शकते.
आंदोलनकर्ते अझीम अशरफ म्हणतात की, पोलिस येथे चोवीस तास तैनात असतात आणि ते नेहमी सतर्क असतात जेणेकरुन मोर्चाकडून कोणतीही चुकीची गोष्ट घडली तर त्यांना येथून उचलून नेता येईल. पण इथे असे काहीतरी घडत असते तर आम्ही इथं का बसलो असतो. लोक फार दुरुन येतात. आणि कधीकधी बिर्याणी, पाणी, फळ आणि इतर पदार्थ खायलासोबत घेऊन येतात. मग आम्ही सर्व खाण्याच्या वस्तू आंदोलनकर्त्यांमध्ये वाटप करत असतो. काही महिला घरून जेवण करुन येतात आणि सोबतही घेऊन येतात. साधारणपणे दुपारी जेवणाचे वाटप केले जाते.
तसेच आम्ही आमच्या परिसराबद्दल माहिती असलेल्या लोकांकडे जातो आणि त्यांच्याकडे मदतीसाठी विचारतो. मग ते कधीकधी आंदोलनकर्त्यांना ब्लँकेट आणि गाद्या देतात. अशाप्रकारे आमचं आंदोलन सुरु आहे असं इमाद अहमद यांनी सांगितले. निषेध करणारी महिला नूर जहां म्हणते की जर तुमच्या घरी एखादा पाहुणा आला तर तुम्ही त्यांचा आदरातिथ्य करता तसं आम्ही आमच्या घरातून जे सामान आणतो जेणेकरुन आम्ही आमच्या पाहुण्यांची काळजी घेऊ शकू कारण ते आमच्या संघर्षात आमच्यासोबत उभे राहतील.
पंजाबमधील आलेल्या लोकांनी केलं अन्नधान्य दान शाहीन बागेत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलकांसाठी लंगर बनवले गेले होते, जे संध्याकाळपर्यंत चालते, शेकडो लोक खाण्यासाठी येतात. याबाबत माहिती देताना हमासिमरन सिंह म्हणाले की, जेव्हा जेव्हा पंजाबमधील आमचे भाऊ येतात. ते निषेध करणार्यांना अन्नधान्य देतात आणि त्यांच्यामुळेआम्ही लोकांना एका वेळेसाठी अन्न देऊ शकतो. त्याचप्रमाणे, इतर कोणत्याही राज्यातून लोक येतात, ते कधीकधी गहू, तांदूळ आणि पीठ घेऊन येतात.