सरकारमधील उच्च पदांपासून ते मोठ्या यशस्वी कंपन्यांच्या मालकांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात महिला यशस्वी होत आहेत. या रोल मॉडेल्समध्ये अनेक महिला IAS आणि IPS यांचाही समावेश आहे, ज्यांच्या सक्सेस स्टोरीतून UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी करणारे अनेक उमेदवार प्रेरणा घेतात.
IPS अधिकारी शहनाज इलियास यांची प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे, ज्यांनी कॉलेज पूर्ण केल्यानंतर जवळपास पाच वर्षे आयटी कंपनीत काम केलं. मात्र, याच दरम्यान त्यांना 9 ते 5 नोकरीचा तिरस्कार वाटू लागला. खरं तर शहनाज यांना त्याच क्षेत्रात करिअर करायचं होतं, जिथे त्या काम करून समाजात बदल घडवू शकतात.
जेव्हा शहनाज या मॅटरनिटी लीववर होत्या आणि या वेळेचा प्रभावीपणे वापर करण्यास उत्सुक होत्या, तेव्हा भारत सरकारसाठी काम करण्याची महत्त्वाकांक्षा वाढली. याच उत्साहाने त्यांनी सेल्फ स्टडीतून तामिळनाडू लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शहनाज नऊ महिन्यांच्या गर्भवती असताना त्यांनी तामिळनाडू लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. केवळ दोन महिन्यांच्या तयारीनंतर त्यांनी पहिल्याच प्रयत्नात तामिळनाडू लोकसेवा आयोगाची प्रीलिम्स परीक्षा पास केली.
प्रत्येक पावलावर पालकांनी दिली साथ
ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शहनाज यांची हिंमत खूप वाढली आणि यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी करण्याचा विचार केला. मात्र, याच दरम्यान शहनाज यांच्यासमोर एक समस्या आली आणि ती म्हणजे परीक्षेची तयारी करायची की बाळाची काळजी घ्यायची. अशा परिस्थितीत शहनाज यांच्या कुटुंबीयांनी तिला मोठ्या प्रमाणात साथ दिली. आई-वडिलांनी आपल्या मुलीची काळजी घेण्याचे कर्तव्य स्वीकारले.
शहनाज इलियास पहिल्याच प्रयत्नात UPSC नागरी सेवा परीक्षा 2020 उत्तीर्ण करण्यात यशस्वी झाल्या. या परीक्षेत त्यांनी ऑल इंडिया 217 वा रँक मिळवला. IPS शहनाज इलियास यांच्या मते, जेव्हा कोणत्याही परीक्षेची तयारी करायची असते, मग ती UPSC असो किंवा इतर कोणतीही परीक्षा, स्वयंशिस्त असणं आवश्यक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.