फडणवीस, राऊत भेट?
नवी दिल्ली : युतीमधील बेबनाव वाढल्याच्या पाश्र्वभूमीवर भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबईतील दौ:यात, तेथील कार्यक्रमांत व भेटीमध्ये काही बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जाण्याआधी मुंबईभेटीचा कार्यक्रम बदलला असेल, असे जाणकार सूत्रने सांगितले.काही दिवसांच्या युतीतील बदलत्या राजकारणाच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारी सकाळी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व सायंकाळी शिवसेनेचे पक्षप्रवक्ते संजय राऊत यांनी शहा यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रंनी दिली. तथापि, फडणवीस व राऊत यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. या भेटीची प्रचंड गुप्तता पाळली जात आहे.
चार तारखेला शहा मुंबईत जात आहेत. या दौ:यातून मातोश्रीची भेट वगळण्यात आल्याने युतीमध्ये चागलीच धुसफुस निर्माण झाली. निवडणुकींच्या पुढय़ात मातोश्रीला वळसा देऊन भाजपाच्या मुंबईतील नेत्यांच्या निवासस्थानी शहा जात आहेत. शहांच्या या प्रवासामुळे संकेत तर वेगळे जातीलच पण राजकीय मार्गही बदलण्याची चर्चा होईल त्यामुळे सुधारणा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (विशेष प्रतिनिधी)