नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेली अटक ही लोकशाहीवरील हल्ला आहे. विरोधी पक्षांवरील दडपशाहीच्या निषेधार्थ ‘इंडिया’ आघाडीने रविवारी, ३१ मार्चला रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर शंखनाद महारॅलीचे आयोजन केले आहे. त्यात ‘इंडिया’ आघाडीतील सर्व बडे नेते सहभागी होणार आहेत.
आपच्या मंत्री आतिशी सिंह, गोपाल राय आणि सौरभ भारद्वाज, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह लव्हली यांनी या महारॅलीबाबतची माहिती दिली. लोकशाहीसाठी राहुल गांधी यांनी देशव्यापी लढा पुकारला आहे. तपास यंत्रणांचा वापर करुन विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले.
मुख्यमंत्र्यांनी चालवले कोठडीतून कामकाजदिल्लीतील समस्यांचे मुख्य सचिव व अधिकाऱ्यांसह निराकरण करावे. पाणी टंचाई असलेल्या भागांत टँकरने पाणीपुरवठा करावा व गरज भासल्यास उपराज्यपालांची मदत घ्यावी. असे पत्रवजा लेखी निर्देश ईडी कोठडीतून मुख्यमंत्री केजरीवाल यांनी जलपुरवठा मंत्री आतिशी सिंह यांना दिले. आतिशी यांनी ते वाचून दाखविले.
‘आतिशी यांनी सादर केलेले पत्र बनावट’आतिशी यांनी सादर केलेले पत्र बनावट असून न्यायालयाच्या परवानगीशिवाय मुख्यमंत्री आदेश देऊ शकत नसल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय सचिव मनजिंदर सिंह सिरसा यांनी केला आहे.
भाजपने सूत्रधाराकडून ६० कोटी घेतलेभाजपने दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याचा सूत्रधार ठरवून शरतचंद्र रेड्डीकडून निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून ६० कोटी रुपये घेतले. त्याचा पुरावा निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे सौरभ भारद्वाज म्हणाले.