नवी दिल्ली : आम आदमी पार्टीतील (आप) अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पक्षाची दोन गटांत विभागणी झाल्याचा दावा पक्षांतर्गत लोकपालाने पत्रात केला. आपच्या संस्थापक सदस्यांपैकी शांतिभूषण यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संघटनात्मक कौशल्यावर, पक्षांतर्गत लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.केजरीवाल हे मोठे नेते व प्रचारक आहेत. मात्र, त्यांच्याकडे संघटनात्मक क्षमतेचा अभाव आहे, असे मला वाटते. संपूर्ण देशभरात पक्षाचा संदेश पोहोचविण्याची क्षमता त्यांच्यात नाही. आपला गेल्या दोन वर्षांमध्ये निवडणूक घेऊन पक्षाची संघटनात्मक बांधणी करता आलेली नाही, हे मोठे अपयश असून त्यामुळेच वेगवेगळा सूर लावला जात आहे, असे ते एका टीव्ही वाहिनीला मुलाखत देताना म्हणाले.अंतर्गत लोकपालाचे पत्रसंवादविच्छेद व परस्पर विश्वास तुटल्यामुळे अंतर्गत लोकशाहीबाबत होत असलेल्या टीकेवर तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे, याकडे पक्षाच्या लोकपालाने लक्ष वेधले आहे. माजी नौदलप्रमुख अॅडमिरल रामदास हे आपचे अंतर्गत लोकपाल आहेत.(लोकमत न्यूज नेटवर्क)
केजरीवालांच्या क्षमतेवर शांती भूषण यांना शंका
By admin | Published: March 01, 2015 11:42 PM