शरद पवार गटाने फेटाळले अजित पवार गटाचे दावे; निवडणूक आयोगाकडे उत्तर सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 06:12 AM2023-09-09T06:12:41+5:302023-09-09T06:13:08+5:30
आपलाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे अजित पवार यांच्या गटाने केला आहे.
नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह याविषयी केलेले सर्व दावे फेटाळून लावणारे उत्तर शरद पवार यांच्या गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केले असून, महायुती सरकारमधील राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांसह ४० आमदारांविरुद्ध अपात्रतेची याचिका दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण त्यांची निवड चुकीची होती, असे नमूद करीत आपलाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे अजित पवार यांच्या गटाने केला आहे. पण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा दावा फेटाळून लावणारे उत्तर आयोगाकडे ई-मेलद्वारे दाखल केले असून, त्यात अजित पवार गटाचे सर्व दावे फेटाळल्याची माहिती सूत्रांनी दिली.