NCP 'चा अध्यक्ष मीच, पदावर दावा कोण करत असेल तर त्यात तथ्य नाही; शरद पवारांचा दिल्लीतून हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 05:57 PM2023-07-06T17:57:47+5:302023-07-06T17:58:28+5:30
राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. यानंतर आता खासदार शरद पवार ऑक्शनमोडमध्ये आले आहेत.
दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता खासदार शरद पवार अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. आज त्यांनी दिल्लीत वर्किंग कमिटीची बैठक घेतली. या बैठकीतून त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. 'मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. दुसरा कोणी अध्यक्ष होणार अशी चर्चा चुकीची आहे. दुसरीकडे, अजित पवार यांनी ही बैठक बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. अजित पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'शरद पवार यांनी बोलावलेली बैठक बेकायदेशीर आहे. राष्ट्रवादीच्या प्रतिनिधीत्वाचा विषय निवडणूक आयोगात आहे. त्यामुळे पक्षातील कोणत्याही व्यक्तीला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्याचा अधिकार नाही, असंही अजित पवार यांनी यात म्हटले आहे.
'नाराजी नाही, अजितदादा आल्याने सरकार मजबूत...; राजीनाम्याच्या चर्चांवर CM शिंदेंचे स्पष्टीकरण
शरद पवार यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीव्यतिरिक्त राष्ट्रीय कार्यकारिणी, राष्ट्रीय पदाधिकारी आणि प्रदेश पक्षाध्यक्षांची आज बैठक बोलावली होती. या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे, खासदार फौजिया खान, वंदना चव्हाण, पीसी चाको (केरळ अध्यक्ष), योगानंद शास्त्री, जितेंद्र आव्हाड, वीरेंद्र वर्मा (हरियाणा अध्यक्ष) शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांच्यासह आहेत.
शरद पवार यांच्या दिल्लीतील बैठकीनंतर पक्षाचे केरळ अध्यक्ष पीसी चाको यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसने नवीन कार्यकारिणीची निवड केली आहे. पक्षाच्या सर्व २७ युनिट समित्या शरद पवार यांच्याकडे आहेत. महाराष्ट्रात पक्षाची एकही समिती अजित पवार यांच्या पाठीशी नाही. राज्याच्या 5 युनिटच्या अध्यक्षांनी लेखी पत्र पाठवून संमती दर्शवली. या बैठकीला इतर समित्यांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत आठ ठराव मंजूर करण्यात आले. शरद पवार यांच्या नेतृत्वावर सर्वांनी विश्वास व्यक्त केला. 9 आमदारांच्या हकालपट्टीच्या निर्णयावरही सर्वांनी संमती दर्शवली, असल्याचे त्यांनी सांगितले.
Today's meeting helped boost our morale...I am the president of NCP, says Sharad Pawar after the party's National Executive meeting in Delhi. pic.twitter.com/gtGXOnaLGz
— ANI (@ANI) July 6, 2023