शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

शरद पवार घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवत होते, अजित पवार गटाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 4:55 PM

एकच व्यक्ती पक्षावर अधिकार गाजवू शकत नाही. पक्षात हेच सुरू होते, असा आरोप अजित पवार गटाने केला आहे. 

नवी दिल्ली :  केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हावरुन आज पुन्हा सुनावणीला सुरुवात झाली आहे. या सुनावणीदरम्यान अजित पवार गटाने मोठा आरोप केला. शरद पवार घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवत होते. तसेच, पक्षाच्या अंतर्गत कामात लोकशाहीचा अभाव होता. एकच व्यक्ती पक्षावर अधिकार गाजवू शकत नाही. पक्षात हेच सुरू होते, असा आरोप अजित पवार गटाने केला आहे. 

अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह हे युक्तिवाद करत आहेत. तर शरद पवार यांच्याकडून अभिषेक मनू सिंघवी हे युक्तिवाद करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे वकील निवडणूक आयोगात उशिराने उपस्थित राहिल्याने सुनावणी 15 मिनिटे उशिराने सुरु झाली. अजित पवार गटाने गेल्या सुनावणीवेळी देखील युक्तिवाद केला होता. त्यानंतर आज पुन्हा निवडणूक आयोग अजित पवार गटाची भूमिका मांडली. यावेळी अजित पवार गटाकडून शिवसेना आणि सादिक अली प्रकरणाता दाखला देण्यात आला. विधीमंडळातील बहुमत आमच्याकडे आहे. त्याचा विचार करुनच निर्णय घ्यावा लागेल. राज्य आणि देशातील पदाधिकारी आमच्यासोबत आहेत, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला.

याचबरोबर, शरद पवार हे घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवत होते, पक्षात लोकशाहीचा अभाव होता असा मोठा दावा अजित पवार गटाने केला. आमदारांची संख्या आपल्याकडे मोठी आहे, त्यामुळे पक्ष आमचाच आहे असा दावाही त्यांनी केला. याशिवाय, पक्षाची घटना आणि कायद्यानुसार निर्णय झाला नाही. पक्षाची घटना आणि घेतलेले निर्णय यात तफावत आहे, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला. यावेळी अजित पवार गटाचे वकील मनिंदर सिंह यांनी पक्षाची घटना वाचवून दाखवली.

यावेळी अजित पवार गटाचे वकील मनिंदर सिंह यांनी पक्षाची घटना वाचवून दाखवली. तसेच, शरद पवार यांची अध्यक्षपदाची निवड निवडणूक घेऊन झालेली नाही. त्यामुळे निवडून न येता एक व्यक्ती पदाधिकाऱ्यांची नेमणूका करत होता. ते योग्य आहे का? शरद पवार एकदाही निवडून आले नाहीत. मग त्यांची नियुक्ती वैध कसं म्हणता येईल? अजित पवार गटाची नियुक्ती कायदेशीर आहे, असा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकिल मनिंदर सिंह यांनी केला. याशिवाय, आमच्याकडे एक लाखाहून शपथपत्रं आहेत. शरद पवारांकडे 40 हजार शपथपत्रं आहेत, असे अजित पवार गटाने सांगितले. तसेच, पक्षात फूट आहे की नाही हे तुम्ही ठरवू शकता. राष्ट्रवादी चिन्ह आम्हाला मिळायला हवे, असेही अजित पवार गटाने सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग