शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजित पवार गटाविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

शरद पवारांचं चुकलंच; राजीनामा मागे घेणार नाहीः तारिक अन्वर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 11:18 AM

काँग्रेसमध्ये जायचं असल्यास पवार साहेबांशी चर्चा करून गेलो असतो. परंतु त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मला पक्ष सोडावा लागला आहे.

नवी दिल्ली- काँग्रेसमध्ये जायचं असल्यास पवार साहेबांशी चर्चा करून गेलो असतो. परंतु त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मला पक्ष सोडावा लागला आहे. राफेल डीलमध्ये पवारांनी मोदींची बाजू घेतली आहे. राफेल प्रकरणावरून मोदींच्या हेतूविषयी जनतेला संशय नाही, असं बोलून पवार साहेबांनी जनतेच्या भावनांचा अनादर केल्याचं तारिक अन्वर म्हणाले आहेत. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत तारिक अन्वर यांनी हे विधान केलं आहे. कुठल्याही परिस्थितीत राजीनामा मागे घेणार नाही. पवार साहेबांचं हे विधान अनेक तास मीडियामध्ये व्हायरल होत होतं. परंतु पवार साहेबांनी त्यावर कोणताही खुलासा केला नाही. विधान चुकीचं होतं मग पवारांनी स्पष्टीकरण द्यायला हवं होतं. सर्व विरोधी पक्ष राफेल डीलवर एकत्र आहेत. राफेल प्रकरणात मोदींचं समर्थन करणं चुकीचं आहे. शरद पवारांबद्दल मला आदर आहे. पक्ष सोडणं माझ्यासाठी सोपी गोष्ट नव्हती. महाराष्ट्रात भाजपाला राष्ट्रवादीनं देऊ केलेला बिनशर्त पाठिंबा ही शरद पवारांनी केलेली मोठी चूक होती.राजीनामा दिल्यानंतर पवार साहेबांशी कोणतीही चर्चा झालेली नाही. शरद पवारांच्या विधानानंतर 24 तास मी वाट पाहिली, परंतु पवार साहेबांनी कोणतंही स्पष्टीकरण न दिल्यानं मी राजीनामा दिला आहे. पवार साहेबांसाठी असलेला आदर कायम राहील. काँग्रेसची विचारधारा आम्ही कधीही सोडलेली नाही. राष्ट्रवादी पक्ष हा काँग्रेसचाच एक भाग आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसRafale Dealराफेल डील