भोपाळ - अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या बाबीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला होता. मंदिर बांधून कोरोना जाणार नाही असे विधान शरद पवार यांनी केले होते. पवार यांच्या या विधानानंतर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, रामजन्मभूमी आंदोलनात आघाडीवर असलेल्या भाजपाच्या आक्रमक नेत्या उमा भारती यांनी आता शरद पवार यांच्या विधानावर जहरी टीका केली आहे. शरद पवार यांनी राम मंदिरावरून केलेले विधान हे मोदी विरोधी नव्हे तर भगवान श्री रामाविरोधातील असल्याचे म्हटले आहे.
उमा भारती शदर पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, ‘’शरद पवार यांनी काल केलेले विधान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील नाही तर भगवान श्री राम यांच्याविरोधातील आहे. पंतप्रधान दोन तासांच्या दौऱ्यासाठी अयोध्येत गेले तर अर्थव्यवस्थेवर कुठले संकट येणार आहे.आपले पंतप्रधान असे व्यक्ती आहेत जे चार तासांपेक्षा अधिक काळ झोपत नाहीत. नेहमीच कार्यमग्न असतात. त्यांनी आजपर्यंत एकही सुट्टी घेतलेली नाही. ते विमानातूनसुद्धा काम करत जातील. मला त्यांचा स्वभाव माहीत आहे. ते फाइल वर्क करत जातील आणि फाइल वर्क करत येतील. भगवान रामांना दोन तास देतील. त्यामुळे मला वाटते की शरद पवार यांचे हे विधान राम द्रोही आहे. ते भगवान श्री रामाविरोधात आहे. ‘’
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर गेले होते. तिथे विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून मोदींवर टीका केली होती. काही लोकांनी वाटतेय की राम मंदिरामुळे कोरोना बरा होईल. कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे हे त्यांनी ठरवायला हवे. सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवे. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या लोकांनी बाहेर काढायला हवे. कदाचित राम मंदिरामुळे कोरोना जाईल असे त्यांना वाटत असावे. कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने देशाची अर्थव्यवस्था खचली आहे. त्यावर मोदींनी लक्ष द्यावे, असे मला वाटत असल्याचे पवार म्हणाले. आपले खासदार याबाबत जिथे गरजेचे आहे तिथे सरकारचे लक्ष वेधतील असे पवार यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल
भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही
…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान
coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी