शारदा घोटाळा : तृणमूलच्या माजी खाासदाराचा पुन्हा जाबजबाब
By admin | Published: February 14, 2015 11:50 PM
कोलकाता : कोट्यवधीच्या शारदा घोटाळाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केल्यानंतर सशर्त जामिनावर सुटका झालेले तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार श्रृंजय बोस यांचा शनिवारी केंद्रीय तपास संस्थेच्या कार्यालयात पुन्हा जाबजबाब नोंदविण्यात आला.
कोलकाता : कोट्यवधीच्या शारदा घोटाळाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केल्यानंतर सशर्त जामिनावर सुटका झालेले तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार श्रृंजय बोस यांचा शनिवारी केंद्रीय तपास संस्थेच्या कार्यालयात पुन्हा जाबजबाब नोंदविण्यात आला. बोस यांची तीन तासावर चौकशी करण्यात आल्याचे सीबीआय सूत्रांनी सांगितले. सशर्त जामीन मिळाल्यानंतर बोस प्रथमच सीबीआय कार्यालयात आले होते. अलीपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना देशाबाहेर न जाण्याच्या आणि चौकशीसाठी पाचारण करताच सीबीआयपुढे हजर होण्याच्या अटीवर गेल्या ४ फेब्रुवारीला जामीन दिला होता. सुटकेनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी तृणमूल काँग्रेस आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. (वृत्तसंस्था)