कोलकाता : कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्यात अडकलेले तृणमूल काँग्रेसचे खासदार श्रींजॉय बोस यांना सीबीआयने पाच तास कसून जाबजबाब घेतल्यानंतर अटक केली.सीबीआयने प. बंगालचे वस्त्रोद्योग मंत्री श्यामपद मुखर्जी यांचीही चौकशी केली. श्यामपद मुखर्जी यांनी आपल्या सिमेंट प्रकल्पाचे शेअर्स शारदा समूहाचे प्रमुख सुदिप्तो सेन आणि तृणमूलचे माजी खा. सोमेन मित्रा यांना विकले होते.बोस यांना अलीपूर येथील न्यायालयात शनिवारी हजर केले जाणार असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. बोस यांना मित्रा यांच्यासोबतच्या व्यवहाराबाबत प्रश्न विचारण्यात आले.शुक्रवारी सकाळी मुखर्जी व बोस हे दोघेही सीबीआयच्या कार्यालयात हजर झाले होते. याप्रकरणी राज्याचे परिवहन मंत्री मदन मित्रा यांनाही हजर होण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता; मात्र त्यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) श्रींजॉय बोस यांची ५ बँक खाती गोठवली आहेत. (वृत्तसंस्था)
शारदा घोटाळ्यात खासदार अटकेत
By admin | Published: November 22, 2014 2:38 AM