शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
8
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
9
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
10
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
11
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
12
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
13
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
14
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
16
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
18
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
19
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
20
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर

शशी थरूर यांनी गाजवले आॅक्स्फर्ड

By admin | Published: July 24, 2015 12:28 AM

होय, तुम्ही भारताचे आणि वसाहतींचे देणे लागता असे स्पष्ट शब्दांमध्ये आॅक्स्फर्ड डिबेटमध्ये इंग्लंडला ठणकावून सांगणाऱ्या खासदार

नवी दिल्ली : होय, तुम्ही भारताचे आणि वसाहतींचे देणे लागता असे स्पष्ट शब्दांमध्ये आॅक्स्फर्ड डिबेटमध्ये इंग्लंडला ठणकावून सांगणाऱ्या खासदार शशी थरूर यांची सध्या सोशल मीडियासह सर्वत्र प्रशंसा होत आहे. थरूर यांचे वक्तृत्व, त्यांनी मांडलेले मुद्दे याचे दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले आहे.केवळ पंधरा मिनिटांच्या या भाषणामध्ये थरूर यांनी भारत ही इंग्रजांची पैसे देणारी दुभती गाय कशी होती आणि दोनशे वर्षांच्या काळात भारताच्या जोरावर इंग्लंडचा कसा विकास झाला हे मांडले. शशी थरूर यांचे हे भाषण आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय वाहिन्यांनी प्रसारित तर केलेच, त्याहून ते टष्ट्वीटर, फेसबुक आणि यू ट्यूबवरूनही मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले. मुद्द्यांनंतर मुद्दे, उत्कृष्ट शैली, नर्मविनोद आणि आधीच्या वक्त्यांचा घेतलेला संयत समाचार अशा विशेष समीकरणामुळे थरूर यांचे हे भाषण अधिकच नावाजले गेले.मोदी यांनी या भाषणातून सर्व भारतीयांच्या भावना मांडल्या गेल्या अशा शब्दांमध्ये त्यांची पाठ थोपटली आहे. थरूर यांचा आजवरचा अनुभव, वाचन आणि प्रभावी सादरीकरणाच्या मिलाफातून तयार झालेल्या भाषणाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर एक आदर्श वस्तुपाठच घालून दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)