Sunanda Pushka Murder Case: सुनंदा पुष्कर प्रकरणात शशी थरूर यांना मिळाला अटकपूर्व जामीन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 12:00 PM2018-07-05T12:00:27+5:302018-07-05T12:22:48+5:30

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात दिल्लीतल्या पटियाळा हाऊस कोर्टानं काँग्रेस नेते शशी थरूर यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

Shashi Tharoor gets interim bail in Sunanda Pushkar murder case | Sunanda Pushka Murder Case: सुनंदा पुष्कर प्रकरणात शशी थरूर यांना मिळाला अटकपूर्व जामीन

Sunanda Pushka Murder Case: सुनंदा पुष्कर प्रकरणात शशी थरूर यांना मिळाला अटकपूर्व जामीन

Next

नवी दिल्ली- सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात दिल्लीतल्या पटियाळा हाऊस कोर्टानं काँग्रेस नेते शशी थरूर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. थरूरला 1 लाख रुपयांच्या बेल बाँडवर हा जामीन देण्यात आला आहे. परंतु शशी थरूर न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेरही जाऊ शकत नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश अरविंद कुमार यांनी दोन्ही बाजूंकडचा युक्तिवाद ऐकला आणि निर्णय राखून ठेवला होता. अखेर त्यावर आज सुनावणी झाली. थरूर यांच्याकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, शशी थरूर एक खासदार आहेत आणि या प्रकरणात त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळायलाच हवा. थरूर यांच्याविरोधात चार्जशीट दाखल झाली आहे. एसआयटीनंही चौकशी पूर्ण केलेली आहे. न्यायालयानं 5 जूनला थरूर यांना समन्स बजावून सात जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं होतं. शशी थरूर यांच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्यानं त्यांच्याविरोधात कारवाई करता येऊ शकते, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. 

वकील विकास पाहवा यांच्यामार्फत दाखल केलेल्या आपल्या या अर्जात थरूर म्हणाले होते की, अटक न करताच आरोपपत्र दाखल करण्यात आले असून एसआयटीने म्हटले आहे की तपास संपला असून कोठडीतील चौकशीची गरज नाही. अटक न करता आरोपपत्र दाखल केले गेल्यास जामीन अटळ आहे, असे कायदा म्हणतो. त्यामुळे आम्ही संरक्षणासाठी विनंती केली आहे म्हणजे आम्हाला 7 जुलै रोजी न्यायालयात हजर राहता येईल, असे थरूर यांच्यातर्फे सांगण्यात आले होते.

Web Title: Shashi Tharoor gets interim bail in Sunanda Pushkar murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.