नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात काँग्रेसचे नेते शशी थरूर सहभागी झाले होते. रविवारी (12 जानेवारी) थरूर यांनी आंदोलनात सहभाग होत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. हा कायदा म्हणजे भारतीय लोकशाहीवरील डाग असल्याचं थरूर यांनी म्हटलं आहे. जामियासह जेएनयू आणि शाहीनबाग येथे सुरू असलेल्या आंदोलकांशी शशी थरूर यांनी संवाद साधला.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा समाजात भेदभावाची दरी निर्माण करणारा आहे. त्यामुळेच देशातील नागरिक हे याविरोधात एकवटले आहेत असं थरूर यांनी जामियामध्ये म्हटलं आहे. या कायद्यामुळे मुस्लिम समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. भारत देश हा अनेक जाती, धर्मांमुळे ओळखला जातो. भारतात एकता आहे. राजकारणापासून दूर राहणाऱ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरणे ही फार मोठी बाब आहे असं देखील थरूर यांनी म्हटलं आहे.
जामियामध्ये एक महिन्यांपेक्षा अधिक काळापासून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. शेकडो विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करत आहेत. आंदोलनात काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांसोबत आहे. ही केवळ धार्मिक लढाई नसून भारत आणि सरकारमधील लढाई आहे असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे. रविवारी थरूर यांचं भाषण सुरू असताना हजारो विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ या भागात वाहतूक कोंडी देखील झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
मोदी, योगींविरोधात घोषणाबाजी कराल, तर जिवंत गाडेन; भाजपा मंत्र्याचं वादग्रस्त विधान
तुकडे तुकडे गँग संपवायची आहे ना? मग लष्करप्रमुखांना आदेश द्या- शिवसेना
उद्धवजी, राऊतांच्या जिभेला लगाम घाला; संभाजीराजांचा संतप्त पवित्रा तर राऊतांनी दिलं प्रत्युत्तर
गाईला स्पर्श केल्यानं नकारात्मकता दूर होते, यशोमती ठाकूरांचा दावा