शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानला फटकारले; शशी थरुर यांनी केले कौतुक, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 21:42 IST

Shashi Tharoor news: पाकिस्तानात अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत भारताने चिंता व्यक्त केली.

Shashi Tharoor S Jaishankar: काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारावर चिंता व्यक्त केली. तसेच, पाकिस्तानला फटकारणाऱ्या परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या वक्तव्याचे समर्थनही केले. थरूर म्हणाले, प्रत्येकजण पाकिस्तानातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जयशंकर यांचे वक्तव्य पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची आपल्याला काळजी असल्याचे द्योतक आहे. यात एक अडचण अशी आहे की, भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या कोणतीही खरी चर्चा सुरू नाही. अन्यथा आम्ही थेट आमच्या समस्या मांडून योग्य कारवाईची मागणी करू शकलो असतो.

शशी थरुर पुढे म्हणाले, परराष्ट्र मंत्र्याचे विधान पूर्णपणे तथ्यात्मक होते. पाकिस्तानात अतिशय विदारक परिस्थिती आहे, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. संसदेत जयशंकर यांच्या विधानानंतर थरुर यांची टिप्पणी आली, ज्यात ते म्हणाले - पाकिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांवर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. 

यावेळी जयशंकर यांनी सभागृहात सांगितले की, पाकिस्तानमध्ये शीख समुदायाशी संबंधित तीन घटना घडल्या. एका प्रकरणात शीख कुटुंबावर हल्ला झाला होता. दुसऱ्या घटनेत शीख कुटुंबाला जुना गुरुद्वारा पुन्हा उघडण्यासाठी धमकावण्यात आले. तर, शीख समुदायातील मुलीचे अपहरण करून धर्मांतराचे प्रकरणही समोर आले आहे. यासोबतच अहमदिया समुदायाशी संबंधित दोन प्रकरणे समोर आली होती. एका प्रकरणात, त्यांची मशीद सील करण्यात आली, तर दुसऱ्या प्रकरणात 40 कबरींची तोडफोड करण्यात आली. याशिवाय, ख्रिश्चन समुदायाशी संबंधित एक प्रकरण आहे. कथितरित्या मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या एका ख्रिश्चन व्यक्तीवर ईशनिंदेचा आरोप करण्यात आला होता.

ह्युमन राइट्स फोकस पाकिस्तानच्या अहवालात काय?तीन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या ह्युमन राइट्स फोकस पाकिस्तान (HRFP) च्या अहवालात 2025 च्या पहिल्या तिमाहीत पाकिस्तानातील हिंदू, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्यांकांवर झालेल्या हल्ल्यांच्या संख्येत तीव्र वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. एचआरएफपीचे प्रमुख नावेद वॉल्टर म्हणाले, पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्याकांवर हल्ले वाढले आहेत, त्यांना मारले जात आहे. त्यांना ईशनिंदेच्या आरोपात गोवले जात आहे. याशिवाय अपहरण, बळजबरीने धर्मांतर, बळजबरीने विवाह करण्याचे प्रकार थांबत नाहीत. मुस्लिमेतरांचे दुःख समजून घेणारे कोणीच नाही. त्यांच्या दुर्लक्षाकडे लक्ष न देणे हे अधिक क्लेशदायक आहे.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरS. Jaishankarएस. जयशंकरPakistanपाकिस्तान