शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शशी थरूर यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं, काँग्रेसला खटकलं! जयराम रमेश स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 23:42 IST

Jairam Ramesh on Shashi Tharoor : दरम्यान काँग्रेसचे दिग्गज नेते तथा खासदार शशी थरूर यांनी पीएम मोदी यांचे कौतुक केले. यानंतर काँग्रेसने ते शशी थरूर यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दोन दिवसीय दौऱ्यावरून परतल्यानंतर, आता काँग्रेस त्यांच्यावर सातत्याने राजकीय टीका करताना दिसत आहे. दरम्यान काँग्रेसचे दिग्गज नेते तथा खासदार शशी थरूर यांनी पीएम मोदी यांचे कौतुक केले. यानंतर काँग्रेसने ते शशी थरूर यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले आहे. 

अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या शिवया, २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड तहव्वुर राणा ते एफ-३५ लढाऊ विमानापर्यंत दोन्ही देशांमधील भागीदारीच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्या.

काय म्हणाले जयराम रमेश - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी, शशी थरूर यांचे विधान वैयक्तिक असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (X) वर पोस्ट करत ते म्हणाले, "अभिव्यक्तीचे पूर्ण स्वातंत्र्य असणारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा आपल्या देशातील एकमेव राजकीय पक्ष आहे जिथे आणि येथे अभिव्यक्तीनंतरही सदस्यांचे स्वातंत्र्य आबाधित राहते. आमचे सदस्य विविध मुद्द्यांवर आपले विचार व्यक्त करत असतात. ते कधीकधी त्यांचे वैयक्तिक विचारही असतात. मात्र, पक्षाची अधिकृत भूमिका ही सर्वोपरी असते."

काय म्हणाले होते शशी थरूर?एएनआय सोबत बोलताना काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, 'अवैध स्थलांतरितांना भारतात पाठवण्याच्या पद्धतीवर का लक्ष दिले गेले नाही? की पंतप्रधान मोदींनी बंद दाराआड हा मुद्दा उपस्थित केला? तसेच, आता व्यापार आणि करासंदर्भात पुढील 9 महिन्यांसाठी चर्चा करण्यासाठी एक करार झाला आहे, मी याचे स्वागत करतो. हे वॉशिंगटनकडून घाईघाईने आणि एकतर्फीपणे आपल्यावर काही शुल्क लादण्यापेक्षा फार चांगले आहे. ज्यामुळे आपल्या निर्यातीला नुकसान झाले असते.

थरूर म्हणाले, "काही तरी चांगले मिळाले, असे मला वाटते आणि एक भारतीय म्हणून मी याचे कौतुक करतो. आपण नेहमीच केवळ पक्ष हितासंदर्भातच नही बोलू शकत. तत्पूर्वी, "अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सर्वात मोठे नेगोशिएटर आहेत, असे त्यांच्या समर्थकांना वाटते. ट्रम्प हे एक उत्तम नेगोशिएटर असल्याचे त्यांच्या संरक्षणमंत्र्याने कालच म्हटले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या पेक्षाही मोठे नेगोशिएटर असल्याचे खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या संयुक्त पत्रकारपरिषदेत म्हटले आहे. हे छोन होते.

टॅग्स :congressकाँग्रेसShashi Tharoorशशी थरूरNarendra Modiनरेंद्र मोदी