'लोकसभा निवडणुकीत BJP सर्वात मोठा पक्ष असेल...', शशी थरुर यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 08:15 PM2024-01-14T20:15:39+5:302024-01-14T20:16:13+5:30

Shashi Tharoor: काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या दाव्याने चर्चेला उधाण.

Shashi Tharoor Prediction: 'BJP will be the largest party in the Lok Sabha elections', claims Congress MP Shashi Tharoor | 'लोकसभा निवडणुकीत BJP सर्वात मोठा पक्ष असेल...', शशी थरुर यांचा मोठा दावा

'लोकसभा निवडणुकीत BJP सर्वात मोठा पक्ष असेल...', शशी थरुर यांचा मोठा दावा

Shashi Tharoor Prediction: लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेससह सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच आगामी निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (BJP) सर्वात मोठा पक्ष असेल, असे भाकित काँग्रेसचे खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी केले आहे. 

मीडियाशी संवाद साधताना थरुर म्हणाले, "भाजप लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. मात्र, त्यांच्या जागांमध्ये लक्षणीय घट होईल. गेल्यावेळच्या तुलनेत भाजपला कमी जागा मिळतील. अशा स्थितीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)तील पक्षांचा भाजपवरचा विश्वास कमी होईल. असेही होऊ शकते की, भाजपचे मित्रपक्ष भाजपऐवजी विरोधी पक्षांना पाठिंबा देतील."

केरळमध्ये जागावाटप अवघड : शशी थरूर
पीटीआयच्या वृत्तानुसार, थरुर पुढे म्हणाले की, "इंडिया आघाडीने योग्यप्रकारे जागा वाटप केले, तर पराभवापासून वाचता येईल. केरळमध्ये सीपीआय (एम) आणि काँग्रेससाठी जागावाटप करारावर एकमत होणे कठीण आहे. पण, तामिळनाडूमध्ये, सीपीआय, सीपीआय(एम), काँग्रेस आणि डीएमके सर्व युतीमध्ये आहेत आणि कोणताही वाद होणार नाही," असंही थरुर यावेळी म्हणाले.

Web Title: Shashi Tharoor Prediction: 'BJP will be the largest party in the Lok Sabha elections', claims Congress MP Shashi Tharoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.