भाजपमध्ये आले अन् क्लीन चिट मिळाली; शशी थरुर यांनी यादीच दाखवली, नारायण राणेंचेही नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 06:19 PM2023-02-28T18:19:52+5:302023-02-28T18:25:03+5:30

यादीत नरायण राणेंसह भावना गवळी, यशवंत जाधव, यामिनी जाधव आणि प्रताप सरनाईक यांचाही समावेश आहे.

Shashi Tharoor shared the list of leaders who got clean chit after joining BJP, Narayan Rane's name too | भाजपमध्ये आले अन् क्लीन चिट मिळाली; शशी थरुर यांनी यादीच दाखवली, नारायण राणेंचेही नाव

भाजपमध्ये आले अन् क्लीन चिट मिळाली; शशी थरुर यांनी यादीच दाखवली, नारायण राणेंचेही नाव

googlenewsNext

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात सुरू असलेल्या CBI चौकशीवरुन केंद्र सरकारवर विरोधक टीका करत आहेत. यावरुनच काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे. थरुर यांनी ट्विटरवर अशा नेत्यांची यादी शेअर केली आहे, ज्यांच्यावर एकेकाळी भ्रष्टाचाराचे आरोप होते आणि आज ते भाजपमध्ये आहेत. 

विशेष म्हणजे, थरुर यांनी शेअर केलेल्या यादीतील काही लोक केंद्रीय मंत्री तर काही राज्यांचे मुख्यमंत्री आहेत. ट्विटरवर यादी जाहीर करताना शशी थरुर यांनी लिहिले की, 'सध्या यावर चर्चा होत आहे, त्यामुळे माझ्याकडे जे आलंय ते मी शेअर करत आहे. ना खाऊंगा ना खाने दूंगा या घोषणेवर नेहमीच आश्चर्य व्यक्त केले जाते. मला वाटते की ही घोषणा गोमांस बद्दल बोलली गेली असावी,' असे ट्विट थरुर यांनी केले.

शशी थरुर यांनी शेअर केलेल्या यादीत राज्यसभा खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचेही नाव आहे. याशिवाय कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा आणि बंगालमधील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांच्या नावांचा समावेश आहे. एवढंच नाही तर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, लोकसभा खासदार भावना गवळी, शिवसेना नेते यशवंत जाधव, आमदार यामिनी जाधव आणि आमदार प्रताप सरनाईक यांचाही समावेश आहे.

 

भाजपमध्ये येण्यापूर्वी नारायण राणेंवर 300 कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग रॅकेट चालवल्याचा आरोप होता. 2016 मध्ये ईडीने राणे यांच्यावर अवघना ग्रुपच्या संगनमताने 300 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा आरोप केला होता. मात्र 2017 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली आणि स्वत:चा पक्ष स्थापन केला. यानंतर 2019 मध्ये राणेंनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला आणि भगवा पक्षाचे भाग झाले.

थरुर यांनी शेअर केलेल्या यादीत बंगालमधील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांचाही नारद घोटाळ्यात सहभाग असल्याचे सांगण्यात आले. तेव्हा ते तृणमूल काँग्रेसमध्ये होते, पण त्यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपनेच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर पाणीपुरवठा घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या माजी खासदार भावना गवळी आता भाजपसोबत सरकार चालवणाऱ्या एकनाथ शिंदे गटाचा भाग आहेत. त्यांनाही ईडीने 5 वेळा समन्स बजावले होते. बीएस येडियुरप्पा यांच्यावरही गृहप्रकल्पात लाच घेतल्याचा आरोप होता.

Web Title: Shashi Tharoor shared the list of leaders who got clean chit after joining BJP, Narayan Rane's name too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.