शशी थरुर यांचे ट्विट, 'कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना'...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 06:59 PM2018-07-13T18:59:01+5:302018-07-13T19:00:43+5:30
काँग्रेस नेते शशी शरुर यांनी किशोर कुमार यांच्या गाण्यातील बोल ट्विट करुन टीका करणाऱ्यांना सुनावले. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना...
नवी दिल्ली - हिंदू-पाकिस्तानवरील टिपण्णीमुळे अनेकांच्या टीकेचे धनी बनलेले काँग्रेस नेते शशी थरुर यांनी आपल्या विधानावर ठाम असल्याचेच पुन्हा एकदा सूचवले आहे. शरुर यांनी किशोर कुमार यांच्या गाण्यातील बोल ट्विट करुन टीका करणाऱ्यांना सुनावले. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना... असे ट्विट थरुर यांनी केले आहे. थरुर यांनी या ट्विटमध्ये गाण्याच्या दोन लाईनसह एक व्हिडिओही शेअर केला आहे.
काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी गुरुवारी एक विधान केले होते. या विधानवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. आगामी निवडणुकीत भाजप सत्तेवर आल्यास ते संविधान बदलतील आणि भारताला हिंदू पाकिस्तानमध्ये बदलून टाकतील, असे विधान थरुर यांनी केले होते. तसेच भाजपसह संघ परिवारावरही थरुर यांनी टीका केली होती. संविधान बदलासाठी भाजप सरकारला राज्यसभेतही बहुमताची गरज आहे. त्यादृष्टीने भाजपसह संघ परिवाराचे प्रयत्न सुरू असल्याचे थरुर यांनी म्हटले होते. दरम्यान, शरुर यांच्या या विधानावरुन भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसला निर्लज्ज असे संबोधले. तसेच काँग्रेसकडून नेहमीच हिंदूंना बदनाम करण्यात येत असून हिंदूंचा अपमान करण्याची एकही संधी काँग्रेस सोडत नसल्याचे पात्रा यांनी म्हटले होते.