Shashi Tharoor: चर्चा तर होणारच! शशी थरूर यांच्या गळ्यात लटकणारे डिव्हाइस काय आहे? शरीरासाठी लाभदायक...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 01:29 PM2022-10-14T13:29:34+5:302022-10-14T13:33:35+5:30
Wearable Air Purifier: शशी थरूर यांच्या गळ्यात लटकणारे डिव्हाइस तुम्ही नेहमी पाहिले असेल, याचा नेमका फायदा काय आहे? जाणून घ्या...
Congress President Election: सध्या काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण होणार, यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी (Shashi Tharoor) थरूर हे दोन नेते पक्षाध्यक्षपदाच्या रिंगणार आहेत. शशी थरूर असं व्यक्तिमत्व आहे, जे सतत चर्चेत असतं. हायफाय इंग्रजी आणि चांगल्या राहणीमणामुळे शशी थरूर नेहमीच प्रकाशझोतात येत असतात. यातच त्यांच्या गळ्यात लटकणाऱ्या एका गॅजेटची सध्या चर्चा होत आहे.
शशी थरूर यांच्या गळ्यात काय?
thanks @anandhusureshIN !🙏 https://t.co/9r8io8khEi
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) October 11, 2022
तुम्हीही थरूर यांच्या गळ्यात एक गॅजेट पाहिले असेल, पण हे नेमकं काय आहे? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? थरूर यांच्या गळ्यात असणारे गॅजेट ब्लूटूथ गॅझेट नाही. हे छोटेसे एअर प्युरिफायर (हवा शुद्ध करणारे यंत्र) (Wearable Air Purifier) आहे. सध्या सर्वत्र प्रदूषण खूप वाढले आहे. अशा प्रदूषणयुक्त वातावरणात हे एअर प्युरिफायर त्यांचे प्रदूषणापासून रक्षण करते. सतत बाहेर प्रवास करणाऱ्या लोकांसाठी, हे एअर प्युरिफायरचा उत्तम पर्याय ठरू शकते.
बाजारात अनेक प्युरिफायर उपलब्ध
तुम्हाला बाजारात अनेक प्रकारचे एअर प्युरिफायर मिळतात. यामध्ये पोर्टेबल किंवा वेअरेबल एअर प्युरिफायरचाही समावेश आहे. या पोर्टेबल एअर प्युरिफायरचे वजनही खूप कमी असते. त्यांची किंमत 8000 ते 15 हजार रुपयांमध्ये असते. तुम्हालाही गरज असल्यास, अशाप्रकारचे वेअरेबल एअर प्युरिफायर तुम्ही खरेदी करू शकता.