ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 9 - तामिळनाडूत आण्णा द्रमुक पक्षामध्ये सुरू असलेली राजकीय वर्चस्वाची लढाई आता रंगतदार टप्प्यावर पोहोचली आहे. अण्णा द्रमुक पक्षाच्या महासचिव शशिकला नटराजन यांनी आज संध्याकाळी राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेत तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेचा दावा केला. यावेळी आपल्याकडे पुरेशा आमदारांचा पाठिंबा असल्याचेही शशिकला यांनी सांगितले. दरम्यान, गरज पडल्यास बहुमत सिद्ध करण्यासाठी पनीरसेल्वम यांना पाठिंबा देऊ असे सांगत राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकने अण्णा द्रमुक पक्षातील वादात तेल ओतले आहे.
आज संध्याकाळी शशिकला यांनी जयललिता यंच्या समाधीस्थानाला भेट देत जयललितांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी राजभवन येथे जात राज्यपालांची भेट घेतली. यावेळी शशिकला यांनी राज्यपालांना आपल्याला समर्थन देणाऱ्या आमदारांचे समर्थन पत्र सोपवले आणि राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला. यावेळी शशिकला यांच्यासोबत अण्णा द्रमुकचे पाच ज्येष्ठ नेतेही होते.
Chinnamma stakes claim to form Government: AIADMK— ANI (@ANI_news) February 9, 2017
Chennai: #VKSasikala leaves Raj Bhavan after meeting TN Governor C Vidyasagar Rao. pic.twitter.com/QqKGn9K0J8— ANI (@ANI_news) February 9, 2017