चेन्नई : अण्णाद्रमुकच्या आमदारांचे अपहरण करून त्यांना गोल्डन बे रिसॉर्टमध्ये सक्तीने डांबून ठेवल्याचा फौजदारी गुन्हा तमिळनाडू पोलिसांनी बुधवारी यासरचिटणीस व्ही. के. शशिकला व विधिमंडळ पक्षाचे नेते एडाप्पदी के. पलानीस्वामी यांच्याविरुद्ध नोंदविला.शशिकला यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदी स्वत:ची निवड करून घेऊन राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केल्यापासून हे आमदार या रिसॉर्टवर राहत आहेत. मुख्यमंत्री पनीरसेल्वम गटाकडून जीवाला धोका असल्याने हे आमदार स्वखुशीने येथे राहात असल्याचा दावा शशिकला गट करीत आहे. चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगण्यासाठी बुधवारी संध्याकाळी बंगळुरुला रवाना होण्यापूर्वी शशिकला तीनदा रिसॉर्टला गेल्या आणि सर्व आमदार आपल्याच बाजूने राहतील याची खात्री करून घेतली होती.सुरुवातीस इतरांसोबत याच रिसॉर्टवर गेलेले परंतु नंतर तेथून ‘सुटका करून घेऊन पनीरसेल्वम गटात सामील झालेले आमदार एस.एस. सर्वानन यांनी दाखल केलेल्या फिर्या दीवरुन पोलिसांनी शशिकला व पलानीस्वामी यांच्याविरुद्ध अपहरण व सक्तीने डांबून ठेवल्याचा गुन्हा नोंदविला. टी शर्ट आणि बर्म्युडा पॅन्ट असे वेशांतर करून मोठ्या मुश्किलीने आपण रिसॉर्टच्या बंदिवासातून पळून आलो, असा दावा सर्वानन यांनी पनीरसेल्वन गटात आल्यानंतर केला होता.या तक्रारीनंतर पोलीस आणि दंगलविरोधी पथक लगेच रिसॉर्टवर पोहोचले. पोलिसांनी तिथे सर्व आमदारांची चौकशीही केली. (वृत्तसंस्था)नातेवाईकांच्या हाती पक्ष-बंगळुरूकडे निघण्यापूर्वी शशिकला यांनी आपले नातेवाईक टी. टी. व्ही. दिनकरन आणि एस. वेंकटेश यांना बुधवारी पक्षात घेतले. जयललिता यांनी या दोघांना पाच वर्षांपूर्वी पक्षातून हाकलले होते.दिनकरन माजी खासदार व शशिकला यांचे भाचे आहेत. शशिकला यांनी त्यांची पक्षाचे उपसरचिटणीस म्हणून नियुक्ती केली. दिनकरन व वेंकटेश यांनी शशिकला यांना व्यक्तिश: भेटून व पत्राद्वारे क्षमा मागितली. दिनकरन, वेंकटेश व शशीकला यांचे पती नटराजन हे सरकार आणि प्रशासनात हस्तक्षेप करीत असल्याच्या बातम्यांनंतर जयललिता यांनी त्यांना २०११ मध्ये पक्षातून काढून टाकले होते.पांडियननी पक्ष सोडलातिरुनेलवेली : दिनकरन यांची पक्षाचे उप सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याच्या निषेधार्थ पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही. करुप्पसामी पांडियन यांनी बुधवारी पक्ष सोडला. तमिळनाडुच्या दक्षिणेकडे पांडियन यांचे नेतृत्व प्रबळ असून द्रमुकमध्ये थोडेच दिवस राहिल्यानंतर ते गेल्या वर्षी अ. भा. अद्रमुकमध्ये परतले होते.
शशिकला, पलानीस्वामींवर गुन्हा
By admin | Published: February 16, 2017 12:49 AM