शत्रुघ्न सिन्हा पुन्हा भाजपमध्ये?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 02:40 IST2020-02-22T02:40:13+5:302020-02-22T02:40:31+5:30
झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांनी

शत्रुघ्न सिन्हा पुन्हा भाजपमध्ये?
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि आता गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक करणारे माजी खासदार व काँग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्या घरवापसीच्या चर्चेला अद्याप दुजोरा मिळाला नसला तरी बिहारमध्ये यंदा विधानसभा निवडणुका होणार असल्याने बिहारी बाबू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्हा यांनी पुन्हा पक्षात यावे, अशी भाजपच्या नेत्यांचीही इच्छा असल्याचे बोलले जात आहे.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांनी आपला झारखंड विकास मोर्चा हा पक्ष अलीकडेच भाजपमध्ये विलीन केला. अमित शहा यांच्यामुळेच हे शक्य झाले, असे म्हणून शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांचे कौतुक केले. मरांडी २00६ साली भाजपमधून बाहेर पडले होते.