शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

'देशात हुकूमशाही सरकार, 2024 मध्ये ममता बॅनर्जी गेम चेंजर ठरतील'- शत्रुघ्न सिन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 2:00 PM

कोलकाता येथे टीएमसीने आयोजित केलेल्या जाहीर सभेत तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्र सरकार आणि मोदी सरकारवर हल्ला चढवला.

कोलकाता: पश्चिम बंगालच्या आसनसोलचे नवनिर्वाचित खासदार आणि बॉलीवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (shatrughan sinha) यांनी कोलकाता येथे झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या बैठकीत (Kolkata TMC Meeting) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे देशातील सर्वात लोकप्रिय नेत्या असल्याचे वर्णन केले आहे. तसेच, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी गेम चेंजर ठरतील असेही ते म्हणाले. 

ते म्हणाले की, 'ममता बॅनर्जी या देशातील सर्वात विश्वासार्ह नेत्या आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीचे सरकार चालत होते, मात्र आता पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) नेतृत्वाखाली हुकूमशाहीचे सरकार सुरू आहे. मी देशातील सर्वात लोकप्रिय नेत्या, बंगालच्या वाघिणी आणि लोह महिला ममता बॅनर्जी आणि त्यांच्या नेतृत्वाला सलाम करतो,' असे सिन्हा म्हणाले. यासोबतच त्यांनी ममता बॅनर्जी यांना देशातील विरोधी पक्षाचा प्रमुख चेहरा असल्याचे म्हटले.

अग्निवीर आणि अग्रिपथच्या नावावर घोटाळा शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले की, 'ममता बॅनर्जी जगात एक रोल मॉडेल म्हणून समोर आल्या आहेत. ममताजींनी युवाशक्ती आणि मनुष्यबळाच्या जोरावर यशाची पताका फडकवली आहे. त्या देशातील सर्वात लोकप्रिय नेत्या आहेत. ममताजींपेक्षा लोकप्रिय नेता कोणी नाही. आज ज्या प्रकारे जीएसटी घोटाळा, नोटाबंदीचा घोटाळा झाला. त्याचप्रमाणे आता अग्निवीर आणि अग्निपथच्या बाबतीत घोटाळा होत आहे. देशात लोकशाही नव्हे तर पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली हुकूमशाही सुरू आहे,' असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाNarendra Modiनरेंद्र मोदीtmcठाणे महापालिका