नवी दिल्ली : नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल हा पक्ष आणि भाजप यांनी तेजस्वीप्रसाद यादव यांच्या राजीनाम्याची मागणी केली असली तरी भाजपचे नेते व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी तेजस्वीप्रसादांचा बचाव केला आहे. केवळ आरोप झाले, म्हणून राजीनामा देण्याची गरज नाही. यापूर्वी अनेकदा अनेकांवर आरोप झाले, पण कोणी राजीनामा दिला नाही, असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. ते म्हणाले की, अनेक नेत्यांवर केवळ एफआयरआर वा गुन्हेच नव्हे, तर आरोपपत्रेही दाखल झाली आहेत. तरीही असे नेते आपल्या पदांवर कायम आहेत. नितीश कुमार व लालूप्रसाद हे परिपक्व आहेत. त्यांनी बिहारच्या हिताकडे लक्ष द्यायला हवे. लवकरच राष्ट्रपतिपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळं तेजस्वीप्रसाद यांच्या विरोधात हे राजकीय षडयंत्र रचलेले असू शकते, असेही सिन्हा यांनी बोलून दाखवले.लालूप्रसाद, राबडीदेवी, तेजस्वीप्रसाद व मिसा भारती यांच्यानंतर रागिणी, हेमा व चंदा यादव या तीन मुली तसेच मंत्री तेजप्रताप यादव यांनाही अघोषित संपत्ती प्रकरणात अडकावण्यात येईल, अशी चर्चा बिहारमध्ये सुरू झाली आहे. यांच्या नावावरही पाटण्यात बरीच बेनामी मालमत्ता आहे आणि सक्तवसुली संचालनालय त्याची चौकशी करीत आहे, असे कळते. रागिणी यांचे पती राहुल सिंह हे काँग्रेसमध्ये आहेत. आधी ते समाजवादी पक्षाचे गाझियाबादचे आमदार होते.
शत्रुघ्न सिन्हा लालूंच्या बाजूने!
By admin | Published: July 16, 2017 1:56 AM