कोलकाता: पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांना उमेदवारी दिली आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी काही दिवसांपूर्वीच याची घोषणा केली होती. यानंतर, भाजपकडून या निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली. बाहेरुन आलेल्या व्यक्तीला तिकीट दिल्याचा ठपका तृणमूलवर ठेवण्यात आला. त्यावर आता स्वतः शत्रुघ्न सिन्हा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
पश्चिम बंगालमध्ये मीडियासाठी संवाद साधताना शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. ''बंगालच्या विकासासाठी नेहमीच उभे राहिलेल्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या नावावर आसनसोलचे मतदार नला मतदान करतील, असा मला विश्वास आहे. पंतप्रधानांसारख्या राष्ट्रीय व्यक्तीला इतर ठिकाणाहून निवडणूक लढवणे मान्य असेल तर माझ्यासाठीही तेच असले पाहिजे. नरेंद्र मोदी गुजरातचे असून, वाराणसीतून निवडणूक लढवतात, त्यांना कुणी काही म्हणत नाही," असे सिन्हा म्हणाले.
भाजपकडून शत्रुघ्न सिन्हांचा विरोधसुकांता मजुमदार आणि अग्निमित्र पॉल यांसारख्या बंगालच्या भाजप नेत्यांनी सिन्हा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी शत्रुघ्न सिन्हांना राज्याबाहेरचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केले आहे. आसनसोल लोकसभा आणि बालीगंगे विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी एप्रिलला मतदान होणार आहे, तर 16 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.
शुत्रघ्न सिन्हांना लोकसभा तर बाबुल सुप्रियोंना विधानसभेची उमेदवारीतृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना आसनसोल लोकसभा मतदारसंघातून आणि बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांना बालीगंगे विधानसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसची उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी बाबुल सुप्रियो यांनी आसनसोल या लोकसभा मतदारसंघातून राजीनामा देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे.