भिंड (मध्यप्रदेश) : रोज २४ किमी सायकल चालवत शाळेला जाऊन इयत्ता १० च्या बोर्डाच्या परिक्षेत ९८.७५ टक्के गुण मिळविणाऱ्या रोशनी भदोरिया या मध्य प्रदेशमधील जिद्दी मुलीचे सर्वदूर कौतुक होत आहे. यापुढेही असाच मन लावून अभ्यास करून ‘कलेक्टर’ होण्याची मनिषा रोशनी हिने व्यक्त केली आहे. मध्य प्रदेश शालेय शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता १० वीच्या परिक्षेचे निकाल शनिवारी जाहीर झाले आणि चंबळ खोºयातील भिंड जिल्ह्याच्या अजनोल गावातील १५ वर्षांची रोशनी सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली. एकूण ९८.७५ टक्के व गणित आणि विज्ञान या विषयांत पैकीच्या पैकी गुण मिळविणारी रोशनी संपूर्ण राज्याच्या गुणवत्ता यादीत आठवी आली. माध्यम प्रतिनिधी अवघ्या १२०० लोकवस्तीच्या या दुर्गम गावात पोहोचले तेव्हा शिक्षणाच्या ध्यासाने अपार कष्ट करण्याची तयारी असलेल्या रोशनीच्या जिद्दीने ते थक्क झाले. इयत्ता आठवीपर्यंत रोशनी गावाजवळच्याच शाळेत शिकली. परंतु पुढील शिक्षणासाठी तिला १२ किमी लांब असलेल्या मेहगाव येथील सरकारी मुलींच्या शाळेत प्रवेश घ्यावा लागला. अजनोलहून मेहगावला जायला अन्य कोणतेही प्रवासाचे साधन नसल्याने इयत्ता नववी व १०वीची दोन वर्षे ती दररोज सायकलने शालेत जायची व परत यायची. तिची रोजची सायकल रपेट २४ किमी व्हायची. एवढे दमून घरी आल्यावरही ती रोज सहा-सात तास अभ्यास करायची.रोशनी म्हणते की, अनेक वेळा पावसाळ््यात रात्री घरीही येता येत नसे. तेव्हा मी मेहगावलाच आमच्या एका परिेचितांच्या घरी राहून दुसºया दिवशी परत यायचे. आता मात्र मी रोशनीला शाळेत जाण्यासाठी दुसरी काही तरी प्रवासाची सोय करीन, असे तिचे वडील पुरुषोत्तम यांनी सांगितले. गावात अभ्यासात इतर कोणीच एवढी हुसारी दाखविली नसल्याने र्स गावाला आनंद झाल्याचे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)आई-वडिलांचे प्रोत्साहनस्वत: रोशनीच्या मेहनतीएवढात आई-वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनाचा तिच्या धवलयशात मोठा वाटा आहे. तिचे वडील पदवीधर आहेत व आई १२वीपर्यंत शिकलेली आहे. चार एकर कोरडवाहू शेती असल्याने आर्थिक परिस्थिती बेताची असूनही कितीही कष्ट पडले तरी तिन्ही मुलांना हवे तेवढे भरपूर शिकू देण्याचा दोन्ही पालकांचा पक्का निर्धार आहे. रोशनीचा एक भाऊ इयत्ता आठवी, तर दुसरा इयत्ता सहावीत शिकत आहे.
रोज २४ किमी सायकल चालवत जायची शाळेत, दहावीच्या परीक्षेत मिळवले ९८%
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 4:27 AM