इरोड (तमिळनाडू) : लग्नघटिका जवळ आली पण, विवाहस्थळी पोहचण्यासाठी पूर आडवा आला. या कठीण परिस्थितीतही २४ वर्षांची ही नवरी डगमगून गेली नाही. लहान गोलाकार बोटीचा आधार घेत जिवाशी खेळत ती थेट विवाहस्थळी पोहचली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्याच्या डोंगरी भागातील या घटनेची सध्या बरीच चर्चा आहे.त्याचे झाले असे की, तामिळनाडूत काही भागात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक नद्यांना पूर आला आहे. तेनगुमारहदा या आदिवासी गावातील रहिवासी रसाथी हिचा विवाह २० आॅगस्ट रोजी व्हावयाचा आहे. मात्र, मुसळधार पावसानंतर सर्वच नद्यानाल्यांना पूर आला आहे. शहराकडे जाणाऱ्या मार्गातही एक नदी आहे आणि ती दुथडी वाहत आहे. पुरामुळे बोटीतून प्रवास करण्यावरही बंदी आहे.नदीचा पूर कमी होण्याचे नाव घेत नाही, हे पाहून त्यांच्या कुटुंबीयांनी वन अधिकाºयांकडून विशेष परवानगी घेतली आणि २0 आॅगस्टऐवजी आधीच विवाहस्थळी पोहोचण्याचा निर्णय रसथी हिने घेतला आणि ती शुक्रवारीच कुटुंबीयांसह निघाली. (वृत्तसंस्था)विश्वासच बसेनाही नवरी कुटुंबीयांसह दुथडी भरून वाहणाºया नदीतून छोट्या गोलाकार बोटीतून निघाली, तेव्हा अनेकांच्या काळजाचा ठोका चुुकला. पाण्यावर हेलकावत जीव मुठीत धरून ती नदीपार पोहचली, तेव्हा सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला. विवाहस्थळी ती व कुटुंबीय पोहचली तेव्हा अनेकांना यावर विश्वासच बसला नाही.
प्रेमाचा पूर! दुथडी नदी पार करून 'ती' पोहोचली लग्नमंडपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 2:22 AM