ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 29 - 33 वर्षाच्या राष्ट्रीय शूटर आणि कोच असलेल्या आयशा फलकने गुंडाशी दोन हात करत आपल्या दिराला वाचवलं आहे. एखाद्या चित्रपटातील प्रसंग असावा असं हे प्रकरण आहे. शनिवारी हा सर्व प्रकार समोर आला. झाले असे की, रात्री 12 च्या सुमारास घरी यायचे म्हणून कॅब बुक करण्यात आली होती. मात्र, कॅबमध्ये असेल्याला दोघांनी त्या तरुणाला बंधक केले. त्यानंतर त्याच्या मोठ्या भावाला फोन करुन पैशांची मागणी केली. मात्र वहिनी आयशा फलकने मोठी चलाखी दाखवून आपल्या दीराला हिम्मत दाखवून त्यांच्या ताब्यातून सोडवले आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.25 मे 2017 रोजी दरियागन येथून एक कॅब बुक करण्यात आली. मात्र, या कारमधून एक जण प्रवास करत होता. थोडे अंतर गेल्यानंतर लुटारुंनी कार दुसऱ्या मार्गावर घेतली. ही बाब लक्षात येताच तरुणांने त्याला विरोध केला. मात्र, लुटारुंनी त्याच्यावर बंदूक रोखत 25 हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी त्यांने आपल्याकडे पैसे नाहीत असे सांगितले. त्यानंतर त्याच्या कानपट्टीवर बंदुक रोखत घरी भावाला फोन करायला सांगितला आणि पैशाची मागणी केली. दरम्यान, पैसे घेऊन येताना पोलिसांना सांगायचे नाही. किंवा सोबत पोलीस नको असे त्यांनी धमकावले. जर असे झाले तर तुझ्या भावाला येथेच उडवून देऊन अशी धमकी दिली. त्यानुसार पैसे घेऊन मोठा भाऊ आणि त्याची वहिनी आयशा फलक भजनपुराचौक पोहोचली. यावेळी आयशा पैसे घेऊन गाडीतून खाली उतरली आणि लुटारुंनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही बाब आयशाच्या लक्षात येताच सावधान होऊन पर्समधील पिस्तोल बाहेर काढत फायरिंग केले. त्यानंतर लुटारु पळाले आणि आपल्या दीराला वाचवले.
गुंडाच्या तावडीतून तिने वाचवले दिराला
By admin | Published: May 29, 2017 10:15 PM