नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची सेवा करत आहेत मला त्यांची सेवा करायची आहे. ते एकटे आहेत. माझंही लग्न मोडलंय त्यामुळे मी देखील एकटी आहे. आम्हाला दोघांनाही साथीदाराची गरज आहे. त्यामुळे मला नरेंद्र मोदीजींशी लग्न करायचे आहे. असे म्हणत गेल्या एक महिन्यापासून एक महिला दिल्लीत धरणे धरुन बसली आहे. त्या महिलेचे नाव ओम शांती शर्मा असे असून ती 40 वर्षांची आहे. विशेष म्हणजे पहिल्या लग्नापासून तिला 20 वर्षांची मुलगी आहे.
राजधानी दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी यापुढे कोणतीही राजकीय, सामाजिक आंदोलने, मोर्चे व घोषणाबाजी करता येणार नाही. राष्ट्रीय हरित लवादाने तिथे यापुढे आंदोलनाला परवानी देऊ नये, असे आदेश दिल्ली सरकारला दिले. त्यानंतर येथे धरणे आंदोलन करणारी ओम शांती शर्मा समोर आली.
राजस्थान जयपूर येथे राहणाऱ्या ओम शांती शर्मा (40) या 8 सप्टेंबरपासून जंतरमंतरवर धरणे धरुन बसल्या आहेत. मोदींना आवाहन करणारे एक मोठे पोस्टर घेऊन ती तेथे बसली आहे. त्यात तिने आपली मोदींशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदीजी एकटे आहेत. माझंही लग्न मोडलंय त्यामुळे मी देखील एकटी आहे. आम्हाला दोघांनाही साथीदाराची गरज आहे. त्यामुळे मला नरेंद्र मोदीजींशी लग्न करायचे आहे. मी जेव्हापासून इथे बसलेय लोक माझ्यावर हसतात, माझी मस्करी करतात पण मला त्यांच्याशी काहीही घेणं देणं नाही. मला मोदींशी लग्न करायचे आहे. ते देशाची सेवा करतात मला त्यांची सेवा करायची आहे. ते जोपर्यंत इथे येऊन माझी भेट घेत नाहीत तोपर्यंत मी इथे अशीच बसून राहणार. असे ओम शांती शर्मानं इंडिया टुडेला सांगितले.
माझे आधी लग्न झाले होते. मात्र तो संसार फार काळ चालला नाही. माझ्या नवऱ्याने मला फसविले. गेली अनेक वर्षे मी एकटीच आहे. फक्त मोदीच माझे दुःख समजू शकतात. मी लग्नाच्या अनेक प्रस्तावांना नकार दिला आणि आता मला मोदींशी लग्न करायचे आहे. जयपूरमध्ये माझ्या मालकीची खूप जमीन आहे. त्यातील काही भाग विकून मोदींसाठी भेटवस्तू घेण्याची माझी इच्छा आहे. असेही तिने सांगितले.
जयपूरमध्ये वीस एकर जमीनजयपूर मधील रखोडा गावात राहणाऱ्या शांती शर्मा यांच्याकडे मोठा जमिन जुमला आहे. त्यांच्या नावावर तब्बल वीस एकर जमिन, दोन घरं आहेत मात्र ते सगळं सोडून त्या मोदींशी लग्न करण्यासाठी उघड्यावर येऊन राहत आहेत.