'शहजाद'नं काँग्रेसमधील अध्यक्षपदाच्या अफरातफरीचा केला खुलासा- नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 04:30 PM2017-12-03T16:30:28+5:302017-12-03T16:39:32+5:30
सुरेंद्रनगर- राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्याच्या प्रक्रियेवर तरुण नेते शहजाद पूनावालांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सुरेंद्रनगर- राहुल गांधी यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्याच्या प्रक्रियेवर तरुण नेते शहजाद पूनावालांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गुजरातमधल्या सुरेंद्रनगर जिल्ह्यात निवडणूक प्रचार रॅलीदरम्यान ते बोलत होते. मोदी म्हणाले, ज्या पक्षाच्या अंतर्गत बाबीत स्वतंत्रता नाही, ते पक्षाच्या लोकांसाठी कसं काम करू शकतील. मी तरुण नेते शहजाद पूनावालांना सांगू इच्छितो की, तुम्ही फारच हिमतीचं काम केलं आहे.
परंतु दुर्दैवानं काँग्रेसमध्ये नेहमीच असं होत असतं. शहजाद यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत होणा-या अफरातफरीचा भांडाफोड केला आहे. शहजाद पूनावाला हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. काँग्रेसनं त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांना पक्षाच्या सोशल मीडिया ग्रुपमधूनही काढून टाकण्यात आलं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव राहिलेल्या शहजाद पूनावाला यांनी काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधींच्या निवड प्रक्रियेवर काही प्रश्न उपस्थित करत हे इलेक्शन नव्हे, तर सिलेक्शन आहे, असं म्हटलं होतं.
A youngster Shehzad has exposed the rigging that is taking place in the Congress president poll. Shehzad is a senior Congress leader in Maharashtra. Congress has tried to muzzle his voice and wants to even remove him from their social media groups. What tolerance is this: PM Modi pic.twitter.com/Uy0w4hGcVh
— ANI (@ANI) December 3, 2017
Those who have no internal democracy can't work for people. I want to say to this youngster Shehzad- you have done a brave thing but this is sadly what has always happened in Congress: PM Narendra Modi in #Gujarat's Surendranagar pic.twitter.com/ittZiKjNu6
— ANI (@ANI) December 3, 2017
Thank you @PMOIndia I will continue my fight against dynasty politics - I will not be cowed down by the attempts to silence me https://t.co/WMt5dwuiDi
— Shehzad Jai Hind (@Shehzad_Ind) December 3, 2017
विशेष म्हणजे शहजाद पूनावाला यांनी थेट राहुल गांधींना पत्र लिहून हे प्रश्न उपस्थित केले होते. तसेच शहजाद आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मनीष तिवारी यांची एक ऑडियो टेपही व्हायरल झाली होती. त्या क्लिपमध्ये मनीष तिवारी म्हणाले होते, तुम्ही असे प्रश्न विचारण्याआधी विचार करायला हवा होता, कारण काँग्रेस ही एक खासगी संपत्ती आहे. त्यानंतर शहजाद पूनावाला यांनीही यावर स्पष्टीकरण दिलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्यासोबत झालेली गोष्ट फक्त सांगितली. मला राहुल गांधींना अध्यक्ष बनवण्यात कोणतीही समस्या नाही, परंतु मी फक्त अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मी नेहमीच काँग्रेससाठी लढत आलो आहे. वंशवादामुळे पक्षाला पुन्हा पुन्हा पराभवाचा सामना करावा लागतो आहे.
Today morning, I called Rahul Gandhi's office to ask him for his time so I could give him the proof that it was a rigged election before he files nomination tomorrow. so. he has some morality& stops process and takes right decision but his office insulted me: Shehzad Poonawalla pic.twitter.com/Y7EhADZtpp
— ANI (@ANI) December 3, 2017