शहरं
Join us  
Trending Stories
1
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
2
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
3
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
4
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
5
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
6
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
7
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
8
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
9
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
10
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
11
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
12
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
13
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
14
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
15
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
16
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
17
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
18
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
19
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
20
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 

शेख हसीना आज भारत सोडण्याची शक्यता; हे होऊ शकतात बांगलादेशचे नवे पंतप्रधान...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 7:57 AM

बांगलादेशच्या हवाईदलाने C-130 विमानाने हसीना यांना भारतात आणून सोडले आहे. हसीना पॅकअप करत असल्याचे लाईव्ह व्हिडीओ पाहून आंदोलकांना आवरण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या सैन्याने देखील आनंदोत्सव साजरा केला आहे.

बांगलादेशातील शेख हसीना यांची १५ वर्षांची सत्ता एका आंदोलनाने उलथवून लावली आहे. हसीना यांना भारतात पळ काळावा लागला असून त्यांना हवाई दलाच्या हिंडन एअरबेसवर उतरावे लागले आहे. हसीना यांनी ५ ऑगस्टला पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि देश सोडला आहे. 

बांगलादेशच्या हवाईदलाने C-130 विमानाने हसीना यांना भारतात आणून सोडले आहे. हसीना पॅकअप करत असल्याचे लाईव्ह व्हिडीओ पाहून आंदोलकांना आवरण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या सैन्याने देखील आनंदोत्सव साजरा केला आहे. हिंडन एअरबेसवर अजित डोवाल यांनी हसीना यांची भेट घेतली. आज त्या लंडन किंवा फिनलँडला जाण्याची शक्यता आहे. शेख हसीना यांच्या जागी नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद यूनुस अंतरिम पंतप्रधान बनू शकतात. 

हसीना यांनी देश सोडल्यानंतर बांगलादेशाच्या सैन्य प्रमुखांनी आम्ही अंतरिम सरकार बनविणार आहोत. देशाला आता आम्ही सांभाळणार आहोत असे सांगितले. तसेच आंदोलनात ज्या लोकांची हत्या झाली त्यांना न्याय दिला जाईल, असेही म्हटले आहे. बांगलादेशच्या राष्ट्रपतींनी तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते खालिदा जिया यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना २०१८ मध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात १७ वर्षांची शिक्षा झाली होती. सत्ता उलथवून लावणारा हा भारताचा तिसरा शेजारी देश आहे. यापूर्वी पाकिस्तान, श्रीलंका या देशांमध्ये असेच भयंकर सत्तांतर झाले होते. 

शेख हसीना सध्या भारतातच असून त्यांना अद्याप ब्रिटनकडून हिरवा झेंडा मिळालेला नाही. हसीना यांना ब्रिटनकडून राजनैतिक शरण हवी आहे. सध्या ब्रिटन देखील अवैध घुसखोरांमुळे जळत असून यामुळे त्यांच्याकडूनही काही स्पष्ट बोलले जात नाहीय. यामुळे सध्यातरी हसीना यांना भारतात राहण्याशिवाय पर्याय दिसत नाहीय. 

हसीना यांच्यासोबत त्यांची बहीण रेहाना देखील आहे. तिच्याकडे ब्रिटनचे नागरिकत्व आहे. रेहाना यांची मुलगी ट्युलिप सिद्दीकी या ब्रिटनमध्ये लेबर पार्टीच्या खासदार आहेत. यामुळे हसीना यांना ब्रिटनमध्ये शरण मिळण्याची शक्यता अधिक आहे. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश