विद्यार्थ्यांच्या उद्रेकामुळे बांगलादेश सोडून भारतात आलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांचे लष्करी विमान आज सकाळी आकाशात झेपावले आहे. सोमवारी सायंकाळी हसीना यांना घेऊन विमान भारताच्या हवाई दलाच्या तळावर उतरले होते. हसीना यांनी लंडनमध्ये राजाश्रय मागितल्याचे वृत्त होते. परंतू, काहीही माहिती न पडता हे विमान आज सकाळीच हसीना यांचे विमान परत माघारी रवाना झाले आहे. हसीना या हिंडन एअरबेसवरच आहेत.
मोठा दावा! शेख हसीनांना आर्मीनेच बांगलादेश सोडायला भाग पाडले, दिली ४५ मिनिटे...
बांगलादेशमधील दंगल आणि राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधींसह अन्य नेते उपस्थित आहेत. परराष्ट्र मंत्री या नेत्यांना परिस्थितीची माहिती देत आहेत. अशातच हसीना यांचे विमान परतीच्या प्रवासाला निघाले आहे.
हसीना या लंडन किंवा फिनलँडला जाऊ शकतात. त्यांची भाची ब्रिटनची खासदार आहे. हसीना यांच्यासोबत त्यांची बहीण आहे जी ब्रिटनची नागरिक आहे. तर दुसरीकडे हसीना यांच्या मुलाने त्यांनी ब्रिटनकडे राजाश्रय मागितल्याचे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान आंदोलकांनी बांगलादेशातील शेरपूर जिल्ह्यातील तुरुंगावर हल्ला केला. या तुरुंगातील ५०० कैद्यांना सोडविण्यात आले आहे.
तसेच चटगावमध्ये सहा पोलीस स्टेशनना आग लावण्यात आली आहे. याचबरोबर अवामी लीगचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या घरांनाही लक्ष्य केले गेले आहे. बांगलादेशच्या राष्ट्रपतींनी भ्रष्टाचाराच्या आरोपात शिक्षा भोगत असलेल्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना २०१८ मध्ये १७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.