Union Budget : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल(दि.23) संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यानंतर आता आज संसदेच्या दोन्ही सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. राज्यसभेत चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी अर्थमंत्र्यांना 'माताजी' म्हटले. त्यावर तात्काळ राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी त्यांना रोखले आणि 'अर्थमंत्री तुमच्या मुलीसारख्या आहेत', असे म्हटले.
असे बजेट कधीही पाहिले नाही...अर्थसंकल्पावर बोलताना काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, 'दोन राज्ये वगळता इतर कोणत्याही राज्याला काहीही दिलेले नाही. फक्त दोघांच्या ताटात पकोडो आणि जेलेबी आहे, तर इतर सगळ्यांची ताट रिकामीच आहेत. अर्थसंकल्पात तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड, पंजाब, ओडिशा आणि दिल्ली यांना काहीही मिळाले नाही. असे बजेट मी यापूर्वी कधीही पाहिले नाही', अशी टीका त्यांनी केली.
आम्हाला बजेटमधून खूप अपेक्षा होतीते पुढे म्हणाले, 'अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्वतः कर्नाटकच्या आहेत, त्यामुळे आम्हाला सर्वाधिक निधी मिळेल, अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. आम्ही यावर टीका करत राहू.' यादरम्यान, मल्लिकार्जुन खरगेंनी सितारामन यांना 'माताजी' म्हटेल. त्यावर धनखड यांनी त्यांना रोखले आणि त्या तुमच्या मुलीसारख्या आहेत,' असे म्हटले. मात्र, खरगेंनी सभापतींच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करत सरकारवर बोचरी टीका केली. "जिथे विरोधी पक्ष निवडून आलाय, जिथे जनतेने तुम्हाला नाकारले आहे, तिथे तुम्ही काहीच दिले नाही," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.