शिमल्यात तिरंगा यात्रा काढल्याप्रकरणी आमदार विक्रमादित्य सिंह यांच्यासह 9 काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 12:04 PM2022-03-30T12:04:00+5:302022-03-30T12:04:50+5:30

Congres MLA Vikramaditya Singh : पोलिसांनी शिमला येथील सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या नेत्यांवर कलम-144 चे उल्लंघन आणि घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे.

shimla breaking news fir against congress mla vikramaditya singh for staging tiranga yatra in shimla | शिमल्यात तिरंगा यात्रा काढल्याप्रकरणी आमदार विक्रमादित्य सिंह यांच्यासह 9 काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा

शिमल्यात तिरंगा यात्रा काढल्याप्रकरणी आमदार विक्रमादित्य सिंह यांच्यासह 9 काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा

Next

शिमला - हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला (Shimla) येथे मंगळवारी रिज मैदानावर तिरंगा यात्रा काढल्याबद्दल पोलिसांनी काँग्रेस आमदार विक्रमादित्य सिंह  ( Congres MLA Vikramaditya Singh) आणि युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष यदोपती ठाकूर यांच्यासह 9 काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी शिमला येथील सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या नेत्यांवर कलम-144 चे उल्लंघन आणि घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे. तसेच, या सर्वांविरोधात 40/2022 u/s 143,188 IPC कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण खलिस्तानी दहशतवादी संघटना SJF च्या धमकीशी संबंधित आहे. 

विक्रमादित्य सिंह यांना खलिस्तानी दहशतवादी संघटनेचा नेता पुन्नू याने 29 मार्च रोजी शिमल्यात खलिस्तानचा झेंडा फडकावण्याची धमकी दिली होती. प्रत्युत्तर म्हणून विक्रमादित्य सिंह यांनी मंगळवारी शिमल्यातील रिज मैदानावर तिरंगा यात्रा काढली. त्यांच्यासोबत काँग्रेस नेते यदोपती ठाकूर यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी सर्वांना सीटीओजवळ रोखले होते. मात्र ते थांबले नाहीत आणि रिजच्या मैदानावर घोषणाबाजी करत तिरंगा फडकवला.

या लोकांविरुद्ध एफआयआर दाखल
शिमला पोलिसांच्या वतीने, आता हिमाचलचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह (Virbhadra Singh) यांचे पुत्र आणि सिमला ग्रामीणचे आमदार विक्रमादित्य सिंह, युवक काँग्रेसचे नेते यदोपती ठाकूर, छत्तर सिंह, राहुल मेहरा, वीरेंद्र बंशू, अमित ठाकूर, राहुल चाहौन, दिनेश चोप्रा, दीपक खुराना आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .

काय म्हणाले विक्रमादित्य सिंह?
तिरंगा यात्रा काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर काँग्रेस आमदार विक्रमादित्य सिंह म्हणाले की, तिरंगा फडकवल्याप्रकरणी आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण काहीही झाले तरी तिरंग्याच्या सन्मानासाठी आम्ही त्रास सहन करू.

Web Title: shimla breaking news fir against congress mla vikramaditya singh for staging tiranga yatra in shimla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.