हिमाचल प्रदेश निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका, 26 नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 08:16 AM2022-11-08T08:16:59+5:302022-11-08T08:20:35+5:30

हिमाचल प्रदेशमध्ये मतदानाच्या चार दिवस आधी काँग्रेसचे एकूण 26 नेते सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये सामील झाले आहेत.

shimla days ahead of himachal assembly election 26 congress leaders join bjp | हिमाचल प्रदेश निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका, 26 नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

हिमाचल प्रदेश निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका, 26 नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

googlenewsNext

शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेशमधील प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस धर्मपाल ठाकूर खंड यांच्यासह राज्यातील अनेक काँग्रेस नेते आणि सदस्यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. 

हिमाचल प्रदेशमध्ये मतदानाच्या चार दिवस आधी काँग्रेसचे एकूण  26 नेते सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये सामील झाले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी 26 काँग्रेस नेत्यांचे भाजपमध्ये जाणे, हा काँग्रेस पक्षाला मोठा धक्का आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी सुधन सिंह यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी सिमल्यातील भाजपचे उमेदवार संजय सूदही उपस्थित होते. 

काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्यांमध्ये काँग्रेसचे माजी सरचिटणीस धर्मपाल ठाकूर, माजी सचिव आकाश सैनी, माजी नगरसेवक राजन ठाकूर, माजी जिल्हा उपाध्यक्ष अमित मेहता, मेहेरसिंग कंवर, युवक काँग्रेसचे राहुल नेगी, जय माँ शक्ती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जोगिंदर ठाकूर, नरेश वर्मा, चमयाना प्रभाग सदस्य योगेंद्र सिंह, टॅक्सी युनियनचे सदस्य राकेश चौहान, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज शिमलाचे अध्यक्ष धर्मेंद्र कुमार, वीरेंद्र शर्मा, राहुल रावत, सोनू शर्मा, अरुण कुमार, शिवम कुमार आणि गोपाल ठाकूर यांचा समावेश आहे.

याचबरोबर, चमन लाल, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव देवेंद्र सिंह, महेंद्र सिंह, माजी युवक काँग्रेसचे सरचिटणीस मुनीश मंडला, बाळकृष्ण बॉबी, सुनील शर्मा, सुरेंद्र ठाकूर, संदीप समता आणि रवी यांनीही सोमवारीच भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या सर्वांचे भाजपमध्ये जोरदार स्वागत केले. यावेळी ते म्हणाले की, भाजपच्या ऐतिहासिक विजयासाठी एकत्र काम करूया.

तत्पूर्वी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हिमाचल विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाचा विजय निश्चित असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, राज्यातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. त्यांनी निवडणुकीच्या राज्यात मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचे कौतुक केले आणि त्यांनी जमिनीवर धोरणे राबविल्याचे सांगितले. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे.

Web Title: shimla days ahead of himachal assembly election 26 congress leaders join bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.