हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे घरं उद्ध्वस्त झाली. जनजीवन विस्कळीत झालं. जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या कालका शिमला रेल्वे मार्गाचेही मोठं नुकसान झालं आहे. लोकांचं जगणं कठीण झालं. आता घरांना भेगा पडू लागल्या आहेत, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घराच्या भिंतीना तडे गेल्याने कुटुंबाला गुरुद्वाराचा आसरा घ्यावा लागला. त्याचवेळी शिमल्याच्या वरच्या भागात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.
नालागड उपविभागातही पावसाने कहर केला आहे. नालागड उपविभागांतर्गत डोंगराळ भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. डोंगराळ भागातील लोकांची घरे कोसळण्याच्या मार्गावर आली आहेत. घरांना भेगा पडल्या आहेत. त्यामुळे घरं पडण्याचा धोका वाढला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरं कोसळली आहेत. गंभीर परिस्थिती आहे.
एका कुटुंबाचं संपूर्ण घर कोसळलं. गावातील लोक जमा झाले आणि पीडित कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे आले. पीडित कुटुंबाच्या वस्तू, सामान गुरुद्वारामध्ये हलवण्यात आल्या आहेत. कुटुंबाला गुरुद्वारामध्ये राहण्यास सांगितलं आहे. कुटुंबीयांनी प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नालागड अंतर्गत डोंगराळ भागात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. लोकांची घरे कोसळण्याच्या मार्गावर आहेत. या पावसाळ्यात निसर्गाने आपले उग्र रूप दाखवले आहे. पावसाने डोंगरी भागातील लोकांचे जगणे कठीण झाले आहे. रस्त्यांपासून घरे, कार्यालये उद्ध्वस्त झाली आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.