शिमला - देशात सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी कोरोनाच्या संकटात अहोरात्र काम करत आहेत. आपल्या कुटुंबापासून दूर राहून रुग्णांची सेवा करत आहेत. मात्र याच दरम्यान डॉक्टरांच्या कँटीनमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समोस्यामध्ये साबणाची वडी सापडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिमला येथे ही घटना घडली आहे.
शिमलाच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजच्या कँटीनमध्ये एका समोस्यात डॉक्टरांना साबणाची वडी सापडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. समोसा खाताना भलतीच चव लागल्याने समोसाच्या आत पाहण्यात आलं. त्यावेळी ही धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी कँटीनमधील जेवणात झुरळ सापडले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आयजीएमसीच्या कँटीनमध्ये डॉक्टरांचा एक ग्रुप सामोसे खात बसला होता. तेथे त्यांना समोसा खाताना साबणाची चव लागली.
समोसा उघडून पाहिला तर त्यात साबणाची अर्धी वडी दिसली. डॉक्टरांनी याची तक्रार आयजीएमसीच्या मेडिकल सुपरिंटेंडेंट (MS) यांच्याकडे केली आहे. ही पहिली वेळ नाही, तर यापूर्वीही अनेकदा जेवणात काहीतरी गडबड असल्याच्या घटना घडल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अनेकदा तक्रार करुनही काहीच परिणाम झाला नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Bihar Elections 2020 : बिहार निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस सज्ज; भाजपा कार्यकारणीशी साधला संवाद
CoronaVirus News : चिमुकल्यांना मास्क लावणं गरजेचं आहे की नाही?, WHO ने जारी केले नवे नियम
'ती' भेट ठरली जीवघेणी! प्रेयसीला लपूनछपून भेटणं पडलं महागात, गावकऱ्यांनी केली तरुणाची हत्या
CoronaVirus News : धोका वाढला! कोरोनाच्या आकडेवारीने रेकॉर्ड मोडला, पुन्हा नवा उच्चांक गाठला
राम मंदिर आणि दिल्लीत घातपाताचा होता मोठा डाव, दहशतवाद्याची धक्कादायक माहिती