शिंदे, अजित पवार यांना एनडीए बैठकीचे निमंत्रण; मोदीची भेट घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 10:43 AM2023-07-16T10:43:26+5:302023-07-16T10:43:58+5:30

नव्या ६ मित्रपक्षांना सामील करून घेणार

Shinde, Ajit Pawar invited to NDA meeting, will meet Modi | शिंदे, अजित पवार यांना एनडीए बैठकीचे निमंत्रण; मोदीची भेट घेणार

शिंदे, अजित पवार यांना एनडीए बैठकीचे निमंत्रण; मोदीची भेट घेणार

googlenewsNext

संजय शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या २४ पक्षांच्या महाआघाडीच्या मुकाबल्यात एनडीएमध्येही सहापेक्षा जास्त नवीन मित्रपक्षांना सहभागी करून महायुती तयार करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील दोन नवीन मित्रपक्ष शिवसेनेचे नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही १८ जुलै रोजी दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत बोलावण्यात आले आहे.

बंगळुरूत होणाऱ्या विरोधी पक्षांच्या महाआघाडीच्या बैठकीला उत्तर म्हणून एनडीएनेही मित्रपक्षांची बैठक १८ जुलै दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 

चिराग पासवान, मांझी यांनाही दिले आमंत्रण
n बिहारचे लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान व हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे नेते जीतनराम मांझी या दोन नवीन मित्रपक्षांच्या नेत्यांना एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी पत्र पाठविले आहे. 
n हे दोन्ही नेते बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच, सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय लोकदलचे नेते जयंत चौधरी व एनडीएचे दोन जुने मित्रपक्ष शिरोमणी अकाली दल व तेलुगू देसम पार्टी यांच्या भूमिकेवरही आहेत. महाराष्ट्रातील तिसरा मित्रपक्ष रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनाही या बैठकीत बोलावले आहे.

Web Title: Shinde, Ajit Pawar invited to NDA meeting, will meet Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.