टोकियो: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर रोजी टोकियो येथे जापानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या राजकीय अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. हे आयोजन टोकियोतील किटानोमारू नॅशनल गार्डनच्या निप्पॉन बुडोकन एरिनामध्ये होणार आहे. क्योदो न्यूज एजेंसीने मोदींच्या दौऱ्याची माहिती दिली आहे. या दौऱ्यात मोदी पंतप्रधान फुमियो किशिदा यांचीही भेट घेणार आहेत.
नरेंद्र मोदी यांनी मे महिन्यात अखेरचा जापान दौरा केला होता. तेव्हा फुमियो किशिदा यांनी 'क्वाड' गटाच्या शिखर परिषदेचे आयोजन केले होते. त्यात ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड स्टेट्सनेही सहभाग नोंदवला होता. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी शिंजो आबे यांची स्वतंत्रपणे भेट घेतली होती. शिंजो आबे हे जापानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिले आहेत. विशेष म्हणजे, मोदी आणि आबे यांची खास मैत्री होती.
जुलैमध्ये झाली आबेंची हत्यागेल्या महिन्यात 8 जुलै रोजी जापानच्या नारा शहरात एका प्रचारसभेत भाषण करताना आबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गोळ्या मारल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तिथे उपचारादरम्यान कार्डिअॅक आणि पल्मोनरी अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाला. आबे यांच्या मृत्यूनंतर पीएम नरेंद्र मोदी यांनी भारतात एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला होता. तसेच, 'माय फ्रेंड, आबे सैन' शीर्षकाने एक ब्लॉगदेखील लिहिला होता.